चेहरा किंवा शरीराच्या कोणत्याही भागात सफेद डाग असणं अनेक प्रकारच्या समस्यांचं कारण ठरतं. हा एक आजार आहे जो वेळीच केलेल्या उपचारांनी ठिक होण्यास मदत होते. आजही अनेक लोक या आजाराबाबत अनेक अंधश्रद्धा बाळगून आहेत. लोक हा देखील विचार करतात की, ज्या व्यक्तीला हा आजार होतो. त्याचं लग्न होण्यातही अनेक अडचणी येतात. पण ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. जर तुम्हाला अशी इच्छा असेल की, त्वचेशी संबधित आजार कायमचा दूर व्हावा. तर तुम्ही एकच उपाय ट्राय करू शकता. तो म्हणजे लाल माती. आजही अनेक ठिकाणी हा आजार दूर करण्यासाठी लाल मातीचा उपयोग करू शकता. लाल मातीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यामुळे अनेक आजारातून सुटका करण्यासाठी तुम्ही लाला मातीचा वापर करू शकता.
का येतात पांढरे डाग?
पांढरे डाग म्हणजे एक प्रकारचा त्वचेचा रोग आहे. जे एखादी अॅलर्जी किंवा त्वचेच्या समस्येमुळे होते. अनेकदा यामागील कारण अनुवंशिकतादेखील असू शकतं. जगभरातील जवळपास 2 टक्के लोक या समस्येने त्रस्त आहेत. भारतातील जवळपास चार ते पाच टक्के लोक या समस्येने पीडित आहेत. घरगुती उपायांनीदेखीला यावर उपचार करणं शक्य आहेच. पण डॉक्टरांचा सल्ला घेणंही फायदेशीर ठरतं.
एकदम सोपा उपाय
पांढऱ्या डागावर लाल मातीचा वापर करणं सोपा आणि रामबाण उपाय आहे. याचा परिणाम 15 ते 20 दिवसांमध्ये दिसू लागतो.
लाल माती
लाल मातीला पांढऱ्या डागांवर रामबाण उपाय मानलं जातं. ग्रामीण भागात हा उपाय सर्रास वापरण्यात येतो. पण शहरातील अनेक लोकांना याबाबत माहिती नसते. ग्रामीण भागातील अनेक लोक या आजारावर उपचार करण्यासाठी आजही लाल मातीचा उपयोग करतात.
असा तयार करा लाल मातीची पेस्ट :
1 चमचा आल्याचा रस2 चमचे लाल माती असा करा लाल मातीचा वापर :
पांढऱ्या डागांवर लाल माती लावण्यासाठी सर्वात आधी एक चमचा आल्याच्या रसामध्ये 2 चमचे लाल मातीची पावडर एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट डागांवर लावा. दोन मिनिटांसाठी मसाज करा आणि त्यानंतर ही पेस्ट सुकल्यानंतर धुवून टाका. असं दररोज करा. त्यामुळे पांढरे डाग नाहीसे होण्यास मदत होते.
काय आहे फायदा?
लाल मातीमध्ये कॉपरचे प्रमाण अधिक असते. अशातच जेव्हा तुम्ही आपल्या त्वचेवर लावण्यासाठी लाल मातीचा उपयोग करतात. तेव्हा हे कॉपर त्वचेमध्ये मेलेनिन तयार होण्यासाठी मदत करतं. ज्यामुळे त्वचेवरील पांढरे डाग ठिक होतात. आल्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह वाढतं, ज्यामुळे पांढऱ्या डाग असणाऱ्या त्वचेला पोषक ततव मिळण्यास मदत होते. परिणामी डाग लवकर ठिक होतात.