स्ट्रॉबेरी खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे असून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठीही स्ट्रॉबेरी फायदेशीर ठरते. यामध्ये सॅलिसिलिक अॅसिड मोठया प्रमाणावर आढळून येतं जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्याचबरोबर कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉलिक अॅसिड, फॉस्फरस, पोटॅशिअम आणि डाएटरी फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे त्वचेच्या समस्यांवर उपाय म्हणून स्ट्रॉबेरी गुणकारी ठरते. जाणून घेऊयात स्ट्रॉबेरीचं सेवन केल्यामुळे त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठी होणाऱ्या फायद्यांबाबत...स्ट्रॉबेरीचे ब्युटी बेनिफिट्स...
1. अॅन्टी-एजिंग समस्या दूर करण्यासाठी
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि एन्टी-ऑक्सीडेंट गुणधर्म मोठ्या प्रमाणावर असतात. याचे सेवन केल्यामुळे वाढत्या वयाची लक्षणं कमी करणं शक्य होतं. अशातच दररोज एक बाउल स्ट्रॉबेरीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
2. त्वचा उजळते
स्ट्रॉबेरीमध्ये अनेक प्रकारचे मिनरल्स आढळून येतात. जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी मदत करतात. स्ट्रॉबेरीचा रस 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून नंतर धुवून टाका. असं आठवड्यातून 3 ते 4 वेळा करा.
3. अॅक्ने दूर करण्यासाठी
1/2 स्ट्रॉबेरी पल्पमध्ये 1 चमचा मलई मिक्स करून चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका. यामुळे त्वचेचे पोर्स स्वच्छ होतील आणि अॅक्नेची समस्याही दूर होईल.
4. डेड स्किनवर उपाय
स्ट्रॉबेरीचा वापर केल्यामुळे डेड स्किन सेल्स स्वच्छ होण्यास मदत होते. डेड स्किन सेल्स स्वच्छ झाल्यामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
5. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. कारण हे शरीरातील कोलाजेनची पातळी वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होऊन त्वचेवर ग्लो येतो.
6. पिंपल्सपासून सुटका
स्ट्रॉबेरीमुळे त्वचेचे पोर्स ओपन होतात. ज्यामुळे त्वचेमधील विषारी पदार्थ बाहेर निघून जातात. यामुळे चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होते आणि पिंपल्सची समस्या दूर होते.
7. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी
स्ट्रॉबेरीमध्ये सॅलिसिलिक अॅसिड असतं, त्यामुळे दात नैसर्गिक पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी मदत होते. तसेच दातांवरील पिवळेपणाही दूर होतो. स्ट्रॉबेरी खाल्यामुळे दात पांढरे होतात त्याचबरोबर मजबूतही होतात.
8. टोनर म्हणून वापरा
स्ट्रॉबेरी बारिक करून त्याचा रस काढून घ्या. आता त्यामध्ये 2 चमचे थंड पाणी आणि काही थेंब गुलाबपाणी मिक्स करा. आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये टाकून टोनरप्रमाणे वापरा. तुम्ही हे टोनर फ्रिजमध्ये 15 दिवसांपर्यंत स्टोअर करू शकता.
9. काळे ओठ गुलाबी करण्यासाठी उपयोगी
काळे ओठ गुलाबी करण्यासाठी हे उपयोगी ठरतं. स्ट्रॉबेरीच्या क्रश घेऊन स्क्रबप्रमाणे ओठांवर मसाज करा. काही वेळाने पाण्याने स्वच्छ करा. दररोज असं केल्याने ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी फायदा होईल.
10. स्ट्रॉबेरी फेसपॅक आणि स्क्रब
3 स्ट्रॉबेरी बारिक करून त्यामध्ये 7 चमचे दूध मिक्स करा. तयार मिश्रण 10 ते 15 मिनिटांपर्यंत लावल्याने चेहरा पाण्याने स्वच्छ करा. याव्यतिरिक्त ग्लोईंग, फ्रेश आणि तजेलदार त्वचेसाठी याचा स्क्रबप्रमाणे वापर करा. यासाठी स्ट्रॉबेरी बारिक करून तिचा गरम पाण्यासोबत वापर करा.