(Image Credit : Beauty & Health Tips)
आपल्या स्कीन केअर रूटीनचा महत्त्वाचा भाग म्हणजे नाइट क्रीम्स. या क्रीमने डॅमेज झालेली त्वचा रात्री रिपेअर केली जाते आणि त्वचेला आवश्यक पोषक तत्त्व मिळतात. सामान्यपणे बाजारात नाइट क्रीम खरेदी करायला गेलात तर किंमतही फार जास्त असते. सोबतच त्वचेच्या प्रकारानुसार, नाइट क्रीमची निवड करणेही कठीण काम आहे. अशात आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. याने तुम्ही घरीच नाइट क्रीम तयार करू शकता.
आल्मंड नाइट क्रीम
(Image Credit : StyleCraze)
हे क्रीम घरीच तयार करण्यासाठी सर्वातआधी कोकोआ बटर वितळवून घ्या आणि त्यात काही चमचे मध आणि बदामाचं तेल टाका. तुम्हाला हवं असेल तर यात तुम्ही गुलाबजलही मिश्रित करू शकता. हे चांगल्याप्रकारे मिश्रित करा. तुमची नाइट क्रीम तयार आहे. ही क्रीम ड्राय त्वचेसाठी परफेक्ट मानली जाते. तशी ही क्रीम कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी वापरली जाऊ शकते. याने त्वचा मुलायम होईल.
अॅवकाडो नाइट क्रीम
ही क्रीम तयार करण्यासाठी १ अॅवकाडोच्या पल्पमध्ये अर्धा कप योगर्ट आणि एक अंड मिक्षित करा. या चांगल्याप्रकारे मिश्रित करून मुलायम पेस्ट तयार करा. हे क्रीम आठवड्यातून कमीत कमी दोनदा चेहऱ्यावर लावा. पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन ए, बी, सी ई असे भरपूर तत्त्व या क्रीममध्ये असतात. याने त्वचेला फायदा होईल. सोबतच ही क्रीम अॅंटी-एजिंगचं देखील काम करते.
चंदन-हळद क्रीम
१ चमचा चंदन पावडर, १ चमचा हळद पावडर आणि चिमुटभर केसर अर्धा कप योगर्ट आणि रात्रभर भिजवून ठेवलेल्या ८ बदामांची पेस्ट चांगल्याप्रकारे मिश्रित करा. हे मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हे क्रीम आठवडाभर चालू शकतं. या क्रीमने त्वचा मुलायम होण्यासोबतच चमकदारही होईल.
ग्लिसरीन क्रीम
त्वचा मॉइश्चराइज करण्यासाठी ही क्रीम परफेक्ट मानली जाते. ही क्रीम घरीच तयार करण्यासाठी २ चमचे गुलाबजलमध्ये १ चमचा खोबऱ्याचं तेल, १ चमचा बदामचं तेल आणि १ चमचा ग्लिसरीन एकत्र करा. यांचं चांगल्याप्रकारे मिश्रण तयार करा. तुमचं नाइट क्रीम तयार आहे.
मिल्क क्रीम
हे क्रीम तयार करण्यासाठी १ चमचा मिल्क क्रीम किंवा मलाई, १ चमचा गुलाबजल, १ चमचा ऑलिव्ह ऑइल आणि १ चमचा ग्लिसरीन घ्या. या सर्वांची एक मुलायम पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका डब्यात बंद करून ठेवा आणि नियमितपणे चेहऱ्यावर लावा.