वातावरण बदलामुळे ओठ फाटणे आणि रखरखीत होणे ही सामान्य बाब आहे. ओठांची त्वचा अधिक फाटल्याने त्यातून रक्त येणे, मास निघणे आणि कोल्ड सोर्स सारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे खासकरुन या दिवसात त्वचेसोबतच ओठांची खाळजी घेणे गरजेचे असते. चला जाणून घेऊ काही खास उपाय...
ओठ फाटण्याचं कारण
ओठांवर पुन्हा पुन्हा हात लावल्याने ते कोरडे होणे, सूज येणे आणि खाज येणे या समस्या होतात. तसेच ओठांवर पुन्हा पुन्हा जिभ फिरवल्यानेही ओठांना कोरडेपणा येतो. ओठांची त्वचा ही तीन थरांची असते आणि ती सतत जिभ लावल्याने कोरडी होते. आपल्या श्वास घेण्याच्या पद्धतीवरुही ओठ फाटण्याची समस्या होऊ शकते. तोंडाने श्वास घेतल्याने ओठ फाटण्याची आणि कोरडे होण्याची समस्या होऊ शकते. ओठांवर सतत येणाऱ्या हवेमुळे त्यांचा ओलावा नष्ट होतो आणि ओठ कोरडे होतात.
काय कराल उपाय?
ओठांवर वेगळं सलस्क्रीन लोशन लावा. याने केवळ त्वचेला कोमलता नाही तर सुरक्षाही मिळेल. सनस्क्रीन लावून उन्हात गेल्यावर ओठ फाटणार नाहीत.
रायबोफ्लेविन, हिरव्या भाज्या खाल्ल्यानेही त्वचा आणि ओठ हेल्दी राहतात. जर तुमचेही ओठ जास्तच कोरडे होत असतील तर हिरव्या भाज्या अधिक खाव्यात. व्हिटॅमिन आणि मिनरल्सचा संतुलित प्रमाणात आहारात समावेश केला तर फायदा होईल.
जास्त प्रमाणात लिप लायनर, लिपस्टिक किंवा लिप ग्लॉस लावल्यानेही ओठांचा ओलावा नष्ट होतो. त्यामुळे ओठांचं फाटणं थांबवायचं असेल तर ही उत्पादने वापरणे कमी करावे. जर उत्पादनांमध्ये अल्कोहोल असेल तर अशी उत्पादने दूरच ठेवा.
तसेच जास्तीत जास्त पाणी प्यावे, याने शरीराची पाण्याची गरज भागेल. यासोबतच सतत सोबच पेट्रोलियम जेली किंवा मेडिकेटेड लिप बाम ठेवा. जेव्हाही तुम्हाला वाटेल की, ओठ कोरडे होत आहेत, तेव्हा हे लाव.