अनेकदा वातावरणात बदल झाल्यानंतर काही लोकांना स्कीन प्रॉब्लेम्सचा त्रास होतो. मुली या प्रॉब्लम्सपासू सुटका करण्यासाठी अनेक उपाय करतात. बऱ्याचदा बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टसचा वापर करतात. या प्रोडक्ट्सचे अनेक साइड इफेक्टस असतात. बदलत्या वातावरणात त्यांना हे समजणं फार कठिण जात की, स्कीन मुलायम आणि निरोगी ठेवण्यासाठी काय करणं गरजेचं असतं. आज आम्ही तुम्हाला स्कीनच्या या प्रॉब्लेम्सपासून सुटका करून घेण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. ज्या कोणत्याही वातावरणात वापरता येतात. या टिप्सचा वापर केल्याने त्यांची स्कीन निरोगी राहण्यासह मदत होते.
1. कोरफड
कोरफडीमध्ये व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. जे स्कीनसाठी फायदेशीर ठरतात. कोरफडीचा ताजा गर काढून तो चेहऱ्यावर लावल्याने स्कीनच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
2. स्क्रब करा
स्कीनचे पोर्स नीट स्वच्छ करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी स्क्रब करा. त्यासाठी तुम्ही घरी तयार केलेलं स्क्रबही वापरू शकता. घरच्या घरी स्क्रब तयार करण्यासाठी साखरेमध्ये खोबऱ्याचे तेल मिक्स करा आणि त्याने स्क्रब करा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका.
3. मॉयश्चराइझ करा
कोणत्याही प्रकारची त्वचा असली तरिदेखील मॉयश्चरायझ करणं गरजेचं असतं. त्यासाठी सकाळी क्लिंजिंग करून त्यानंतर त्यावर चांगलं मॉयश्चरायझर लावा. अशातच रात्री मेकअप काढल्यानंतर झोपण्यापूर्वी मॉयश्चरायझर किंवा नाइट क्रिम लावा.
4. स्कीनचं उन्हापासून रक्षण करा
उन्हापासून स्कीनचं रक्षण करणं गरजेचं असतं. उन्हामुळे स्कीनला फार नुकसान पोहोचतं. त्यासाठी घरातून बाहेर पडताना सनस्क्रीन क्रीम वपरा. परंतु त्याचसोबत सनग्लोज किंवा हॅट वापरा.
5. योग्य डाएट फॉलो करा
वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी डाएटमध्ये भाज्यांचा आणि सलाडचा समावेश करावा. तेलकट पदार्थ खाणं टाळावं.
6. व्यायाम करा
जर तुम्हाला त्वचा उजळवायची असेल तर दररोज व्यायाम करा. त्यामुळे शरीरातून घाम येतो आणि त्याचबरोबर विषारी पदार्थही शरीराबाहेर टाकले जातात. त्यमुळे स्कीन ग्लो करण्यास मदत होते.