(Image Credit : living.anveya.com)
थंडीला सुरुवात झाली की, त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करत असतात आणि शोधत असतात. पण तरीही या दिवसात त्वचेची काळजी घेणं एक आव्हानच ठरतं. पण तुमची त्वचेची काळजी घेण्याची समस्या सोडवण्यासाठी महागडी उत्पादने न वापरता कमी खर्चातही तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. मध आणि हळदीच्या माध्यमातून तुम्ही त्वचा आणखी चांगली ठेवू शकता. हळद आणि मधाचा आहारात समावेश करुन तुम्ही त्वचेचा चमकदारपणा कायम ठेवू शकता. यासाठीच काही टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
हळद + मध = चमकदार त्वचा
अर्धा चमचा हदळ पावडर आणि अर्धा चमचा मध एक ग्लास पाण्यात मिश्रित करा. हे पाणी बर्फाच्या ट्रेमध्ये टाकून फ्रिजरमध्ये ठेवा. दोन तासांनी याच्या आइस क्यूब तयार होतील. या आइस क्यूब दोन मिनिटांपर्यत चेहऱ्यावर फिरवा.
याने त्वचेचा चमकदारपणा वाढतो आणि त्वचा मुलायम होते. त्वचेवरील मृत पेशीही दूर होतात, रंग उजळतो, त्वचा टाइट होते, चेहऱ्यावरील डाग दूर होतात. तसेच त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यासही याने मदत होते.
कसा कराल वापर?
१) लिंबाचा रस आणि दही मधात मिश्रित करुन लावल्याने टॅनिंग दूर होते.
२) मध, हळद आणि गुलाबजल एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्याने चेहरा अधिक उजळतो.
३) मध, बेकिंग सोडा एकत्र करुन हात आणि पायांवर लावल्यास त्वचेवरील मृत पेशी दूर होतात.
४) मध आणि दालचीनीची पावडर एकत्र करुन चेहऱ्यावर लावल्यास पिंपल्स दूर होतात.
५) मध आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करुन लावल्यास त्वचेवरील डाग कमी होतात.
६) बटाट्याच्या पेस्टमध्ये मध मिश्रित करुन लावल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.