आपण बर्फाचा वापर कोल्डड्रिंक्स किंवा एखादं पेय पदार्थ थंड करण्यासाठी वापरतो. पण जर एका विशिष्ट पद्धतीने वापरलं सौंदर्य वाढविण्यासाठीही बर्फ फायदेशीर ठरतो. खरं तर त्वचेसाठी सध्या व्हेजिटेबल आइस क्यूब्सचा वापर करण्याचा ट्रेन्ड व्हायरल होत आहे. जो त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो.
व्हेजिटेबल आइस क्यूब्स
बटाटा, टोमॅटो आणि काकडीपासून तयार करण्यात आलेल्या आइस क्यूबचा वापर करून तुम्ही फक्त पिंपल्सच नाहीचर सनबर्न, डाग, अंडरआर्म्समधील काळपटपणा, डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही व्हेजिटेबल आइस क्यूब्स आणि त्यांच्या वापरामुळे त्वचेला होणाऱ्या फायद्यांबाबत सांगणार आहोत.
(Image Credit : Rashmi's Kitchen)
टोमॅटो आइल क्यूब्स - डार्क सर्कल्स
टोमॅटो आणि लिंबाचा रस आइस ट्रेमध्ये टाकून त्याचे आइस क्यूब तयार करा. आता हा आइस क्यूब दिवसातून दोन वेळा डार्क सर्कल्सवर रब करा. एखाद्या कॉटनच्या कपड्याच्या आतमध्ये ठेवून आइस क्यूबचा वापर करा. हे त्वचेसाठी उत्तम क्लींजर आणि टोनर म्हणून काम करतं आणि याला ड्राय होण्यापासून वाचवतं. यामुळे डार्क सर्कल्सची समस्या दूर होते.
बटाटा आइस क्यूब - डार्क सर्कल्ससाठी
बटाट्यापासून तयार करण्यात आलेले आइस क्यूबच्या मदतीने चेहऱ्यावर मसाज केल्याने पोर्स स्वच्छ होतात आणि त्वचा टाइट होते. डोळ्यांखालील डार्क सर्कल्सवर बटाट्याच्या रसापासून तयार केलेल्या आइस क्यूबने मसाज केल्याने काही दिवसांमध्ये डार्क सर्कल्स दूर होतात.
बटाटा आइस क्यूब - डार्क अंडरआर्म्स
बटाटा आइस क्यूब फक्त डार्क सर्कल्सवरच नाहीतर डार्क अंडरआर्म्सची समस्या दूर करण्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. बटाट्याची पेस्ट आणि पाणी एकत्र आइस ट्रेमध्ये टाकून आइस क्यूब तयार करा. त्यानंतर कमीत कमी 20 मिनिटांपर्यंत डार्क अंडरआर्म्सवर रब करा आणि 10 मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर हे ताज्या पाण्याने स्वच्छ करा. नियमितपणे असं केल्याने डार्क अंडरआर्म्सची समस्या दूर होण्यास मदत होते.
(Image Credit : The Harvest Kitchen)
काकडीचा आइस क्यूब - टॅनिंग आणि पिंपल्ससाठी फायदेशीर
सनबर्न, टॅनिंग, चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स यांसारख्या ब्युटी प्रॉब्लेम्सवर काकडीचा आइस क्यूब फायदेशीर ठरतो. यासाठी काकडीचा रस आणि कडुलिंबाचं तेल एकत्र करून आइस क्यूब तयार करा. याच्या मदतीने तुमचा चेहरा, मान आणि हातांच्या कोपऱ्यावर मसाज करा. 15 ते 20 मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर पाण्याच्या मदतीने स्वच्छ करून घ्या. यामध्ये लिंबाचा रस एकत्र करू शकता.
कोरफडीचा आइस क्यूब - डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी
कोरफडीचं जेल आइस ट्रेमध्ये एकत्र करून आइस क्यूब तयार करा आणि त्याच्या मदतीने डोळे आणि चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटांसाठी रब करा. त्यानंतर 10 मिनिटांसाठी असचं ठेवून पाण्याने चेहरा स्वच्छ करा. यामुळे त्वचेला आतमधून थंडावा मिळतो. तसेच डोळ्यांचा थकवा दूर होऊन चेहऱ्यावरील ग्लो टिकवण्यासाठी मदत होते.
गुलाब पाणी - सनटॅन आणि पिंपल्सपासून सुटका
त्वचेवरील सनबर्न आणि पिंपल्स दूर करण्यासाठी आइस क्यूबच्या मदतीने मसाज करा. याव्यतिरिक्त डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी काकडीचा रस गुलाब पाण्यासोबत एकत्र करून चेहऱ्यावर मसाज करा. काही दिवसांमध्येच डार्क सर्कल्स दूर होतील.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)