आपली त्वचा नाजूक असते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेणं गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये त्वचेवर अत्यंत लवकर ऊन, धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम दिसून येतो. अशातच उन्हाळ्यात त्वचेची खास काळजी घेणं गरजेचं असतं. त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी बाजारातील सौंदर्यप्रसाधनांचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा उपाय करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. अनेकदा आपण बॉडी वॉशचा वापर करतो. पण त्यामध्ये त्वचेसाठई घातक असे अनेक केमिकल्स वापरण्यात आलेले असतात. तुम्हीही बाजारातील बॉडी वॉश वापरत असाल तर त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी घरी तयार केलेला बॉडी वॉश वापरण्यास सुरूवात करा. जाणून घ्या काही हर्बल बॉडी वॉश तयार करण्याची सोपी पद्धत...
घरीच तयार करा हर्बल बॉडी वॉश
साहित्य :
- कॅस्टाइल साबण
- मध
- कोरफडीचा गर
- ऑलिव्ह ऑइल
- 40 ते 50 थेंड एसेंशिअल ऑइल
हर्बल बॉडी वॉश तयार करण्याची पद्धत :
- एका रिकाम्या बाटलीमध्ये एक-एक करून सर्व साहित्य एकत्र करा.
- त्यानंतर त्यामध्ये एसेंशिअल ऑइलचे काही थेंब एकत्र करा.
- मिश्रण व्यवस्थित एकत्र केल्यानंतर बॉटल थंड जागेवर स्टोअर करा. याचा वापर तुम्ही एक वर्षभर करू शकता.
हर्बल बॉडी वॉशचे फायदे :
- ऑलिव्ह ऑइल आणि कोरफडीचा गर यामध्ये मुबलक प्रमाणात मॉयश्चर असतं. त्यामुळे याचा वापर केल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.
- एसेंशिअल ऑइल त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी लाभदायक ठरतात. त्यामुळे घरी तयार केलेल्या हर्बल बॉडी वॉशचा वापर करणं फायदेशीर ठरतं.
- कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी हा बॉडीवॉश फायदेशीर ठरतो.
- घरीच हर्बल बॉडी वॉश तयार करून त्याचा वापर करू शकता आणि उन्हाळ्यामध्येही तुम्हाला फ्रेश आणि कूल ठेवू शकता.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.