वातावरण कसंही असलं तरीही शरीराला घाम येतोच. उन्हाळ्यात किंवा दमट वातावरणात घामामुळे अगदी हैराम व्हायला होतं. यामुळे अनेकदा कुठे येण्याजाण्याची इच्छाही होत नाही. अनेकदा शरीराला येणारा घाम चिडचिडीचं कारणं ठरतो. परंतु, काही पद्धती आहेत, ज्या या समस्येला कायमचं दूर करण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया घाम दूर करण्यासाठी उपयोगी ठरणारे उपाय...
शेव किंवा वॅक्सिंग करणं
शरीरावर केस असणं म्हणजे, जास्त घाम येणं, त्यामुळे टाइम टू टाइम शेव करणं किंवा वॅक्सिंग करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. यामुळे त्वचेची रोमछिद्र क्लीन राहण्यास मदत होते. त्यामुळे सतत घाम येण्याची समस्याही कमी होते.
लोशन आणि क्रिम
स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी लोशन आणि क्रिम अत्यंत आवश्यक असतं. याच कारणामुळे घाम जास्त येतो. यापासून बचाव करण्यासाठी असं लोशन किंवा सनस्क्रिन निवडाल तर वॉटर किंवा जेल बेस्ड असावं. तुम्ही शक्य असल्यास कोरफडीचं लोशन किंवा समर स्पेशल लोशनही निवडू शकता. जे त्वचेमध्ये अगदी सहज अब्जॉर्ब होतं आणित्वचा चिपचिपीत होत नाही. यामुळे घामही कमी येतो.
कपडे
जास्त घाम येत असेल तर सैल आणि सुती कपड्यांचा वापर करा. कॉटनचे कपडे यासाठी उत्तम पर्याय आहेत. तसेच लाइट कलर निवडा. जास्त डार्क कलरच्या कपड्यांमुळे उष्णता आणि सनलाइट शोषून घेतात. त्यामुळे शरीराचं तापमान वाढतं आणि घाम जास्त येतो. त्यामुळे लाइट फॅब्रिक आणि कलरचे कपडे बेस्ट चॉइस आहे.
अजिबात खाऊ नका हे पदार्थ
जास्त ऑयली, स्पायसी, नॉन व्हेज आणि फास्ट फूड खाणं टाळा. हे सर्व पदार्थ पचवण्यासाठी शरीराला जास्त एनर्जी लागते. ज्यामुळे घाम जास्त येतो.
कूल ड्रिंक्स
घाम कमी येण्यासाठी शरीराला बाहेरूनच नाहीतर आतूनही कूल ठेवणं आवश्यक असतं. त्यासाठी तुम्ही ताक, दही, लस्सी, नारळाचं पाणी, ताज्या फळांचे ज्यूस, भाज्यांचे ज्यूस यांसारख्या पदार्थांचं सेवन करा.
नॉर्मल तापमानाची सवय लावा
उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एसीमध्ये राहणं पसंत करतात. त्यामुळे शरीराला घामही येत नाही. पण असं केल्याने शरीराला एसीची सवय होते. त्यामुळे प्रयत्न करा की, जास्तीत जास्त नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये राहा. ज्यामुळे शरीराला अगदी सहज अडजस्ट होण्यास मदत होते आणि घामही कमी येतो.
सफरचंदाचं व्हिनेगर
सफरचंदाचं व्हिनेगर एका बाउलमध्ये घ्या आणि कापसाच्या मदतीने जास्त घाम येणाऱ्या अवयवांवर लावा. रात्रभर तसचं ठेवा आणि सकाळी धुवून टाका. असं मानलं जातं की, व्हिनेगरमुळे पोर्स टाइट होण्यास मदत होते आणि त्यामुळे घाम कमी होतो.
ब्लॅक टी
एक कप पाणी गरम करा आणि त्यामध्ये चहा पावडर एकत्र करा. उकळल्यानंतर गॅस बंद करा. पाणी थंड झाल्यानंतर गाळून घ्या आणि ते पाणी कापसाच्या मदतीने जास्त घाम येणाऱ्या अवयवांवर लावा. ब्लॅक टीमध्ये सफरचंदाचं व्हिनेगरप्रमाणेच गुणधर्म असतात. त्यामुळे पोर्स टाइट होऊन घाम येण्याची समस्या दूर होते.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)