शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

Useful Tips: इस्त्री केलेल्या कपड्यांना सुरकुती पडू नये म्हणून सोपी ट्रिक वापरून बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 4:09 PM

Useful Tips: इस्त्री केल्यानंतरही काही कपडे पटकन चुरघळतात, अशा वेळी कडक इस्त्री राहावी म्हणून फॉलो करा खालील टिप्स!

सुरकुतलेल्या कपड्यांचा प्रभाव पडत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन' असे आपण म्हणतो. म्हणून इस्त्रीबंद कपडे घालणे पसंत करतो. मात्र कपडे अंगावर चढले की काही काळातच त्याची इस्त्री उतरते आणि ते चुरघळतात. अशा वेळी कोणत्या ट्रिक्स वापरता येतात ते पाहू. 

कपडे धुताना घ्या काळजी :

कपडे नीट धुतले नाहीत तर सुकल्यानंतर खराब होतात. त्यानंतर कपडे कितीही चांगले इस्त्री केले तरी सुरकुत्या आणि डाग उठून दिसतात. कपड्यातील साबण धुतला जावा यासाठी किमान ३ वेळा पाण्याने कपडे धुवावेत. यानंतर तुम्ही ते व्यवस्थित पिळून पाणी काढून टाकावे. पाणी काढून टाकल्यानंतरकपडे झटकणे आवश्यक आहे. यामुळे सुरकुत्या दूर होतात आणि इस्त्री न करताही व्यवस्थित दिसतात. 

जाड कपड्यांना इस्त्री 

सॉफ्ट मटेरिअल असेल तर वरवर केलेली इस्त्री पुरते, पण कापड जेव्हा जाडसर असते, तेव्हा त्याची घडी छान बसावी म्हणून पाण्याचा हबका देत जोर लावून इस्त्री फिरवावी. त्यामुळे कपड्यांना दीर्घकाळ इस्त्री टिकून राहते.

सगळे कपडे एकाच वेळी इस्त्री करून ठेवू नका 

अनेक लोकांना आठवडाभराचे कपडे इस्त्री करून ठेवायची असते. जबाबदाऱ्या आणि वेळेच्या अभावी हा निर्णय घेतला जातो,  हे मान्य! परंतु, तसे केल्याने कपाटात कपड्यांची गर्दी होते आणि एक कपडा बाहेर काढताना बाकीचे चार कपडे बाहेर येतात आणि विस्कटतात. म्हणून शक्यतो एका वेळी एकच कपड्याला इस्त्री करा आणि शक्य नसेल तर दोन ते तीन कपडेच इस्त्री करून ठेवा, त्यापेक्षा अधिक नको! त्यामुळे कपड्यांना इस्त्री चांगली राहील आणि सुरकुत्या पडणार नाहीत. 

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सfashionफॅशन