(Image Credit : Liver Doctor)
महिलांच्या शरीरावर येणाऱ्या नको असलेल्या केसांना हिर्सुटिज्म असं म्हणतात. हा एक प्रकारचा आजार आहे, ज्यामध्ये महिलांना नको असलेल्या ठिकाणी केस येतात. यामध्ये अनेकदा पुरूषांप्रमाणे महिलांना चेहऱ्यावर केस येतात. तसेच या केसांची वाढही लगेच होते. त्यामुळे हे सौंदर्य बिघडवतात. खरं तर हा एक आजार असून वेगवेगळ्या कारणांमुळे होतो. जाणून घेऊया नक्की कोणत्या कारणांमुळे हिर्सुटिज्म आजार होतो आणि नको असलेल्या केसांपासून सुटका करण्यासाठी कोणते उपाय करणं फायदेशीर ठरतं त्याबाबत...
(Image Credit : velvet.by)
एंड्रोजन हॉर्मोन्सचा स्तर वाढणं
शरीरामध्ये हार्मोन्समध्ये बदल झाले खासकरून एंड्रोजन हार्मोन्स ज्यांना मेल हार्मोन्स असंही म्हणतात. हे हार्मोन्स वाढल्याने महिलांमध्ये नको असलेल्या केसांची समस्या पाहायला मिळते. याव्यतिरिक्त या आजाराचे इतरही अनेक कारणं असू शकतात. ज्यांमध्ये रोमछिद्रांची संवेदनशीलता हेदेखील एक कारण असू शकतं. केसांनाही रोमछिद्र असतात. जे एंड्रोजन हार्मोन्स वाढल्याने ओपन होतात आणि महिलांना या समस्यांचा सामना करावा लागतो.
फॅमिली हिस्ट्रीदेखील एक कारण
हिर्सुटिज्म हा आजार फॅमिली हिस्ट्रीमुळेही होतो. जर तुमच्या कुटुंबामध्ये आधीपासूनच कोणाला हा आजार असेल तर त्यामुळे हा आजार येणाऱ्या पुढच्या पिढीलाही होऊ शकतो. औषधांचं सेवन
काही औषधं अशी असतात ज्यांच्या सेवनाने शरीरामध्ये एंड्रोजन हार्मोनचा स्तर वाढवतो. तेच अनेकदा औषधांमुळे हार्मोन्सचं बॅलेन्स बिघडतं. जे या आजाराचं कारण बनतं.
गर्भावस्था आणि मोनोपॉज
गर्भावस्था आणि मोनोपॉजच्या दरम्यानही महिलांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे हार्मोनल चेजेंस होतात. ज्यामुळे हा आजार होण्याचा धोका वाढतो. असं फआर कमी प्रकरणांमध्ये होतं.
(Image Credit : Dr. Axe)
नको असलेल्या केसांपासून सुटका करा
जर तुम्हीही तुमच्या अंगावरील नको असलेल्या केसांमुळे हैराण झाला असाल तर काही उपायांनी तुमची ही समस्या दूर होऊ शकते. साखर, लिंबाचा रस आणि थोडसं पाणी एकत्र करून गरम करा. हे थंड करा आणि नको असलेल्या केस असण्याच्या ठिकाणी लावा. 20 ते 25 मिनिटांसाठई तसचं ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका. नको असलेल्या केसांची समस्या दूर होते. याव्यतिरिक्त ओटमील आणि पिकलेली केळी एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट केस असलेल्या ठिकाणी लावा. 15 मिनिटं ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुवून टाका.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.