शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
2
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
5
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
6
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
7
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
8
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
9
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
10
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
11
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
12
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
13
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
14
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
15
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
16
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
17
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
18
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
19
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
20
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया

​‘व्हायरल इन्फेक्शन’ होतय ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2016 7:14 AM

पावसासोबतच आजारांचेही आगमन होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

-रवींद्र मोरे पावसासोबतच आजारांचेही आगमन होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यावर्षी तर डेंग्यू आजाराने कहरच केला. मात्र डेंग्यू नंतर लोकांना सर्वात जास्त त्रास होत आहे ते व्हायरल इन्फेक्शनचे. याला जबाबदार अनेक कारणेही आहेतच. मात्र सर्वांनी व्यक्तिगत काळजी घेतली आणि घरेलू उपाययोजना केली तर होणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनपासून आपला बचाव होऊ शकतो. आजच्या सदरात आपण व्हायरलपासून सुरक्षित राहण्यासाठी काय उपाय आहेत, हे जाणून घेऊया....लक्षणे : व्हायरल दरम्यान विशेषत: चक्कर येणे, खोकला आणि गळ्यात खरखरीतपणासारख्या समस्या निर्माण होतात. या दरम्यान संतुलित आहाराने आपली प्रतिकारशक्तीच वाढत नाही, तर व्हायरलमुळे आलेल्या तापालासुद्धा लांब ठेवते. जाणून घेऊया की, कोणत्या सुपरफूड्समध्ये व्हायरल इन्फेक्शन लांब ठेवण्याची क्षमता आहे. पाणी : जेव्हा आपण कोणत्याही व्हायरल इन्फेक्शनपासून प्रभावित असाल तर सर्वात अगोदर त्याचा समुळ नाश कसा होईल याची काळजी घेतली गेली पाहिजे. आणि यावर सवोत्कृष्ठ पर्याय म्हणजे पाणी. कोणत्याही व्हायलरला लांब ठेवण्यासाठी पाणी हा सर्वांपेक्षा चांगला पर्याय आहे. पाण्याचा अधिक सेवनाने आपण शरीरातील टॉक्सिनला बाहेर काढु शकतात. तुळस : जर आपल्याला व्हायरल ताप आला असेल तर आपण तुळसीचे सेवन आवर्जून करा. सकाळी चहात तुळस टाकून प्या. एवढेच नव्हे तर, तुळसच्या पानांना पिण्याच्या पाण्यात टाकूनही पिऊ शकतात. संत्रीचा ज्यूस : व्हायरल तापात संत्र्याच्या ज्यूसचा खूपच फायदा होतो. शरीर बळकट होण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताज्या संत्र्याचा ज्यूसचे नियमित सेवन करा.ब्लॅक टी : व्हायरल दरम्यान ब्लॅक टीमध्ये अद्रकचा रस आणि एक चमचा मध टाका आणि याचे सेवन करा. तसेच  कोमट पाण्यासोबत अद्रकचा रस घेऊ शकतात. यामुळे गळ्यालादेखील आराम मिळेल आणि ताप लवकर बरा होण्यास मदत होईल.   उकळलेली भाजी : व्हायरल दरम्यान हलक्या प्रमाणात उकळलेल्या विना मसाला टाकलेल्या भाज्यादेखील फायदेशिर असतात. काळी मिरची आणि थोडेसे मिठ उकळलेल्या भाज्यांमध्ये टाकून खाल्यास शरीराचे तापमान सामान्य राहते आणि प्रतिकारशक्तीदेखील वाढते.  दाळ : व्हायरल तापाने त्रस्त असाल तर आपण दाळीचे सेवन क रायला हवे. यामुळे शरीरास ताकद मिळून कमजोरी दुर होते.   लसून : डायटमध्ये लसूनचा वापर केल्यास झालेल्या इन्फेक्शनला लवकर मुळासकट नष्ट करु शकता.पुदीना : पुदीनाच्या सेवनानेही ताप लवकर बरा होतो. इन्फेक्शन दरम्यान पुदीनाचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि नैसर्गिकरित्या  इनफेक्शनपासून मुक्तता मिळते. सूप : भाज्यांचे सूप पिल्याने किंवा प्रोटीन आणि विटॅमिनयुक्त फळ खाल्याने  तापापासून आराम मिळतो. अशा पद्धतीने व्हायरल इन्फेक्श्नदरम्यान घरातील पदार्थांचा योग्य वापर केल्यास विविध आजारांपासून आपण मुक्त होऊ शकतो.