(Image Credit : MyBeautyGym)
त्वचेवर ग्लो तेव्हाच येतो जेव्हा त्वचा खोलवर स्वच्छ असेल. म्हणजे त्वचा ग्लोइंग दिसण्यासाठी त्यातून फ्री रॅडिकल्स, धूळ-माती आणि इतरही विषारी तत्त्व बाहेर येणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज चेहऱ्याची डीप क्लीनिंग करा. आणि असा आहार घ्या ज्याने सुरकुत्या आणि पिंपल्स त्वचेपासून दूर राहतील. चेहरा तजेलदार आणि उठावदार दिसावा यासाठी तुम्ही चॉकलेट आणि खोबऱ्याच्या फेसपॅकचा वापर करू शकता.
कॉफीचे फायदे
(Image Credit : makeupandbeauty.com)
कॉफीने त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन होण्यास मदत मिळते आणि सेल्सचा विकासही होतो. यातील तत्त्व चेहऱ्यासाठी स्क्रबचं काम करतात. तसेच कॉफी एक चांगलं एक्सफोलिएटर सुद्धा आहे. ज्याने डेड स्कीन दूर करण्यासही मदत मिळते. त्यासोबतच कॉफी त्वचा डॅमेज होण्यापासूनही वाचवते आणि सूर्याच्या घातक किरणांपासूनची त्वचेची सुरक्षा करते.
खोबऱ्याच्या तेलाचे फायदे
खोबऱ्याच्या तेलात काही असे गुण असतात जे मायक्रोब्स आणि इतर किटाणुंपासून त्वचेची रक्षा करतात. खोबऱ्याचं तेल त्वचेसाठी एक मॉइश्चरायजर म्हणून काम करतं. याच्या नियमित वापराने निर्जिव त्वचा ताजीतवाणी होऊ शकते. या दोन्ही गोष्टींच्या मिश्रणाने तुम्ही त्वचेवर एक वेगळाच निखार आणू शकता.
कसा तयार कराल कॉफी-कोकोनट फेस पॅक
(Image Credit : Indian Beauty Tips)
मास्क तयार करण्यासाठी सर्वातआधी एका वाटीमध्ये २ चमचे कॉफी घ्या आणि त्यात ४ ते ५ खोबऱ्याच्या तेलाचे थेंब टाका. हा कॉफी-कोकोनट फेस पॅक चांगल्याप्रकारे मिश्रित करा आणि दहा मिनिटांसाठी तसाच ठेवा.
हा फेस पॅक लावण्याची योग्य पद्धत
(Image Credit : masalathai.com)
हा फेस पॅक पूर्ण चेहऱ्यावर लावा. काही वेळा तसाच चेहऱ्यावर लावून ठेवा आणि नंतर नॉर्मल पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून दर दुसऱ्या दिवसाने हा मास्क चेहऱ्यावर लावा. हा मास्क चेहऱ्यावर लावल्यावर जास्त जोरात घासू नका. हलक्या हाताने चेहऱ्याची मसाज करा.
या गोष्टींचीही घ्या काळजी
१) त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी त्वचा हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा सैल होते आणि त्वचेची चमक दूर होते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे.
२) तळलेले-भाजलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका. तसेच जंक फूड आणि प्रोसेस्ड फूडही खाऊ नका.
३) आहारात वेगवेगळी फळं आणि भाज्यांसोबतच, दही, छास, काकडी यांचा समावेश करा.
४) नियमितपणे चेहऱ्याची स्वच्छता करा. मेकअप फार जास्त वेळ चेहऱ्यावर राहू देऊ नका आणि रात्री झोपताना चेहऱ्या चांगला स्वच्छ करा.
(टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.)