प्रत्येक व्यक्ती हा सुंदर असतो. फक्त काहींना गरज असते ती थोडा साज श्रृंगार करण्याची. अनेकदा तर गोरा चेहरा असूनही त्याची योग्य ती काळजी न घेतल्याने चेहरा निर्जीव वाटतो. तर चेहऱ्याची चांगली काळजी घेतली गेली तर वाढत्या वयाच्या खुणा चेहऱ्यावर दिसत नाहीत. जर तुम्हालाही चेहरा चमकदार, ताजातवाणा करायचा असेल तर केमिकल युक्त प्रॉडक्टऐवजी पुदीन्याची पाने ट्राय करा.
केमिकल युक्त प्रॉडक्टचे तोटे
महिला आपला चेहरा आकर्षक करण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्सची वापरतात. पण त्यातून होणारा फायदा फार काळ टिकत नाही. अनेकदा चेहराही खराब होतो. त्यामुळे काही नैसर्गिक वनस्पतींचा वापर केला तर त्याचे साइड इफेक्टही होणार नाहीत आणि चेहराही आकर्षक होईल.
पुदीन्याच्या पानांचे चेहऱ्याला फायदे
वाढत्या वयाच्या खुणा - जसजसं वाढतं तसतसे चेहऱ्यावर डाग किंवा चट्टे दिसू लागतात. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर आणि हे डाग दूर करायचे असतील तर पुदीन्याच्या पानांची पेस्ट चेहऱ्यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. याने चेहऱ्याची पिग्मेंटेशनची समस्या दूर होऊ शकते.
पिंपल्स होतील दूर - पुदिन्यामध्ये सॅलिसिलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. जे चेहऱ्यावरी घाण आणि पिंपल्स दूर करण्यास मदत करतं. यासाठी पुदीन्याच्या पानांची पेस्ट करुन त्यात काही थेंब गुलाब जल टाका. ही पेस्ट चेहऱ्यावर साधारण १५ ते २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. काही दिवस हा प्रयोग केल्यास तुम्हाला फायदा दिसेल.
सुरकुत्यांची समस्या - जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्यांची दिसत असतील तर तुमचं वय जास्त असल्याचं दिसतं. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही पुदीन्याचा रसात दही किंवा मध मिश्रित करा. ही पेस्ट १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा. याने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतील.
चमकदार चेहऱ्यासाठी - पुदीन्याची पाने केवळ चेहऱ्याची चांगली स्वच्छताच करत नाही तर तुमच्या चेहराही चमकदार करतात. पुदीन्याच्या पानांची पेस्ट किंवा रस नियमीत चेहऱ्यावर लावाल तर तुमचा चेहरा आणखी आकर्षक होतो.
(टिप : हे उपाय करण्याआधी एकदा तज्ज्ञांकडून तुमच्या त्वचेची माहिती घ्या. कारण काहींना या पानांची अॅलर्जी असेल तर समस्या होऊ शकते)