(Image Credit : wisebeards.com)
एका पुरूषासाठी त्याच्या मिशा आणि दाढी ही त्याची शान असते. पण अनेकदा काही काळाने पुरूषांची ही शान कमी होऊ लागते. म्हणजे मिशीचे किंवा दाढीचे केस गळू लागतात. मिशीचे केस कमी गळण्याची वेगवेगळी कारणे असतात. मिशीचे केस हे त्वचेच्या हेअर फॉलिकलमधूनच उगवतात. तसेच आपल्या डोक्याचे केस उगवतात. ज्याप्रमाणे काही लोकांच्या डोक्यावरील केस दाट नसतात, तशीच काहींची मिशीही दाट नसते.
हेअरफॉल प्रमाणेच काही पुरूषांच्या मिशीचे केस गळायला लागतात. याची वेगवेगळी कारणे आहेत. जसे की, हार्मोनचं असंतुलन किंवा औषधाचे साइड इफेक्ट. चला जाणून घेऊ मिशीचे केस गळण्याची काही कारणे....
एलोपेसिया एरियाटा यूनिवर्सलिस
एलोपेसिया एरियाटा युनिवर्सलिस ही एक मेडिकल टर्म आहे. हे एकप्रकारचं शरीराचं ऑटो इम्यून सिस्टम असतं. यात डोक्याची त्वचा आणि शरीरावर हेअर लॉसचं लक्षण दिसू लागतं. जेव्हा शरीराचं ऑटो इम्यून सिस्टम स्वत: कमजोर होऊ लागते. तेव्हा हेअर फॉलिकल्सचं कार्यही कमी होऊ लागतं. यामुळे मिशी आणि दाढीचे केस गळू लागतात.
कॅन्सरची ट्रीटमेंट
कॅन्सरचे उपचार घेत असाल तेव्हाही शरीरावरील केस गळू लागतात. कॅन्सरची ट्रीटमेंट कीमोथेरपी आणि रेडिएशनच्या माध्यमातून सुरू केली जाते. याने केसांच्या पेशी पूर्णपणे नष्ट होतात. केवळ डोक्याचेच नाही तर चेहऱ्यावरील, आय ब्रो, प्यूबिक हेअरही गळू लागतात. पुरूष आणि महिला दोघांवरही हा प्रभाव बघायला मिळतो.
कमी टेस्टोस्टेरोनचं प्रमाण कमी झाल्याने...
व्यक्तीमध्ये एखाद्या खास मेडिकल कंडीशनमुळे टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं. या स्थितीला Hypogonadism असं म्हटलं जातं. अशा स्थितीत मिशीचे केस गळण्याची लक्षणे दिसू लागतात. सोबतच चेहऱ्यावरील केसांचाही विकास थांबतो.
काय करावे घरगुती उपाय
वेगाने दाढीचे केस वाढवण्यासाठी आवळा फार फायदेशीर ठरतो. दाढी आणि मिशीचे केस वाढवायचे असतील तर रोज आवळा तेलाने १५ मिनिटे चेहऱ्याची मसाज करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. चेहऱ्याची मालिश केल्याने रक्तप्रवाह चांगला होता आणि दाढी-मिशीचे केस वाढण्यासाठी आवश्यक पोषण मिळतं.
मोहरीचं तेल
मोहरीच्या तेलाने चेहऱ्याची मालिश करूनही तुम्ही केस वाढवू शकता. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळा करावा.