रोज धुळ, उन्हामुळे आणि प्रदुषणामुळे त्वचेचं नुकसान होतं. याने त्वचेच्या वरच्या सेल्स नष्ट होतात. या डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी आणि चेहऱ्यावर पुन्हा ग्लो आणण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. डेड स्कीन सेल्स दूर करण्यासाठी स्क्रबचा अधिक प्रयोग केला जातो. पण याने त्वचा काळी पडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे यावर पील ऑफ मास्क जास्त फायदेशीर ठरतो असे मानले जाते. चला जाणून घेऊया काय आहे पील ऑफ मास्क आणि काय आहेत त्याचे फायदे.
चेहऱ्याला देतो ग्लो
फेस पीलिंगचा वापर स्कीनच्या वायटनिंगसाठी आणि ब्रायटनिंगसाठी केला जातो. फेस पीलिंगनंतर नवीन स्कीन लेअर चेहऱ्यावर येते. स्कीन मुलायम आणि टाइट होते. सोबतच रफ आणि ड्राय स्कीन मुलायम करण्यासाठीही पीलिंगचा फायदा होतो.
डेड स्कीन सेल्स दूर होतात
पील ऑफ मास्क लावल्याने चेहऱ्यावरील डेड स्कीन सेल्स निघून जातात आणि त्वचेवर नवीन लेअर येते. डेड स्कीन निघून गेल्याने त्वचेचा रंग आणखी उजळतो. धुळ आणि जास्त वेळ उन्हात राहिल्याने डेड स्कीन सेल्स तयार होतात. कधी कधी तुम्ही घरातून जास्त बाहेर निघाले नसतानाही हवेतील प्रदुषणामुळे त्वचेचे सेल्स मरतात. अशात हे स्वच्छ करण्यासाठी पील ऑफ मास्क फायदेशीर ठरु शकतो.
पील ऑफ मास्कमध्ये असतात अॅंटी-ऑक्सिडेंट्स
जास्तीत जास्त पील्स हे झाडे आणि फळांवर आधारित असतात आणि सुरक्षित असतात. फळे किंवा फळांच्या सालीमध्ये असलेले अॅंटी-ऑक्सिडेंट्स तुमच्यासाठी फायदेशीर असतात. पील ऑफ मास्कमध्ये असलेल्या अॅंटी-ऑक्सिडेंट्समुळे त्वचेवर वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही. अधिक काळापर्यंत तुम्ही तरुण दिसू शकता. तसेच पिंपल्स, डार्क स्पॉट आणि पिगमेंटेशन कमी करण्यासही याने मदत होते.
इतरही अंगांवर पील ऑफ करणे
पीलिंग हे प्रामुख्याने चेहऱ्यासाठी असतं, पण अंडरआर्ममधील काळे डाग दूर करण्यासाठी, पिम्पल्सचे डाग दूर करण्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. तसेच याने स्कीन ट्रेक्सचरही आणखी चांगलं होतं.