आपली त्वचा आणि सौंदर्य याबाबत अनेक महिला नेहमी जागरूक असतात. त्यासाठी विविध उपाय सतत करत असतात. बाजारात त्वचेसाठी फायदेशीर असणारं एखादं प्रोडक्ट आलं आहे आणि त्याबाबत त्यांना माहीत नाही, असं क्वचितच होईल. या फक्त माहितीच करून घेत नाहीत तर अशा प्रोडक्टचा त्या आपल्या डेली रूटिनमध्ये समावेशही करतात. त्यामुळे जर तुम्हीही त्यांपैकी एक असाल तर मिस्लर वॉटरबाबत नक्की जाणून घ्या. हे एक खास स्किन केयर प्रोडक्ट आहे, जे मार्केटमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे.
(Image Credit : parshindia.com)
काय आहे मिल्सर वॉटर?
प्रोडक्टच्या नावावरूनच समजतं की, हे एक प्रकारचं पाणी आहे. पण सामान्य पाण्यापेक्षा फार वेगळं आहे. साधारण पाण्यामध्ये जे तेलकट पदार्थ असतात, हे पाणी त्यापासूनच तयार होतं. स्कन एक्सपर्ट्सनुसार, पाण्यातील हेच तेलकट पदार्थ त्वचेवरील अस्वच्छ घाण खेचून घेण्यास मदत करतं. याच तेलकट पदार्थांपासून तयार करण्यात आलेलं मिस्लर वॉटर त्वचेवर वापरल्याने त्वचा स्वच्छ आणि फ्रेश होते.
मिस्लर वॉटरचे फायदे :
- मिस्लर वॉटरच्या फायद्यांबाबत बोलायचे झाले तर याचा सर्वात पहिला फायदा चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासाठी होतो. हे अगदी सहज संपूर्ण मेकअप काढण्यास मदत करतो आणि त्वचेवर कोणतीही केमिकल रिअॅक्शन होत नाही.
- जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर पाण्याची कमतरता असेल तर मिस्लर वॉटर फेसवॉशप्रमाणे वापरू शकता. याचा वापर करून चेहरा फक्त स्वच्छ करा. चेहऱ्यावरील धूळ-मातीसोबत एक्स्टरा वॉटरही निघून जातं आणि चेहरा स्वच्छ होतो.
- मिस्लर वॉटरचा मॉयश्चराझरप्रमाणेही वापर केला जाऊ शकतो. कारण हे साधारण फेसवॉशप्रमाणे वापर केल्यानंतर चेहरा ड्राय होत नाही. याचा वापर केल्याने स्किन फ्रेश, सॉफ्ट आणि मुलायम होते.
(Image Credit : Allure)
कसा कराल मिस्लर वॉटरचा वापर?
मिस्लर वॉटरचा वापर करण्याती पद्धत फार सोपी आहे. तुम्हाला त्यासाठी फक्त कॉटन पॅड किंवा कॉटन बॉलचा मिस्लर वॉटर लावण्यासाठी वापर करावा लागेल. त्यानंतर चेहऱ्यावर सर्क्युलर मोशनमध्ये लावा. हिच पद्धत मेकअप काढण्यासोबतच चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी करावी लागते.
टिप : वरील सर्व उपाय घरगुती आहेत आणि केवळ माहिती म्हणून आम्ही हे वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते त्यामुळे सर्वच उपाय सर्वांच्याच त्वचेसाठी फायदेशीर असतील असं नाही किंवा असा दावाही आम्ही करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.