मऊ, आकर्षक त्वचा मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनांचा वापर करत असतो. त्यात सगळ्यात महत्वाचं आणि रोजच्या वापरात असलेलं म्हणजे आपण साबणाचा वापर अंघोळ करताना हमखास करत असतो. तर काही वेळेला लिक्वीड सोपचा वापर सुद्धा केला जातो. आज आम्ही तुम्हाला त्वचेसाठी फायदेशीर काय असतं त्याबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून तुमची त्वचा चांगली राहील आणि त्वचेवर इन्फेक्शन होणार नाही. अनेक लोक अंघोळ करण्यासाठी साबणाचा की लिक्वीड सोपचा वापर करावा याबाबत संभ्रमात असतात.
बॅक्टीरियांपासून बचाव
साबणाचा वापर नुकसानकारक बॅक्टिरीया आणि जर्म्सना साफ करण्यासाठी केला जातो. काही लोकांना असं वाटतं असतं की साबणाचा वापर अनेकदा केल्यामुळे बॅक्टिरीया साबणाला चिकटतात आणि त्वचेपर्यंत पोहोचतात. त्यामुळे लिक्वीड साबणाचा वापर योग्य आहे. पण १९८८ च्या डायल कॉर्पोरेशनद्वारे करण्यात आलेल्या रिसर्चद्वारे असं स्पष्ट करण्यात आले आहे की साबणाचा अनेकदा वापर करून सुद्धा त्यातील बॅक्टिरीया त्वचेवर राहत नाहीत. म्हणूनच सोप आणि लिक्विड हे दोन्ही वापरासाठी चांगले आहेत.
दोघांच्या किमतीत अंतर
सर्वसामान्यपणे बार आणि सोपच्या तुलनेत लिक्विड सोप खूपच स्वस्त असतो. या व्यतिरीक्त तुम्हाला एक गोष्ट नेहमी जाणवत असेल ती म्हणजे लिक्विडचा वापर आपण अनेकदा गरजेपेक्षा जास्त करत असतो. तुलनेने साबणाचा वापर कमी केला जातो. साबणाची वडी ही लिक्विडच्या तुलनेत अधिक काळापर्यंत चालत असते.
इंग्रीडिएंट्समध्ये फरक
सर्वाधिक वड्या असलेले साबण हे वनस्पती तेलापासून तयार केले जातात. लिक्विड तयार करण्यासाठी त्यात जाडसरपणा येण्यासाठी केमिक्लस वापरले जातात. तसंच फेस जास्त येण्यासाठी diethanolamine or DEA एकत्र केलं जातं. म्हणून लिक्विडचा वापर करण्यापेक्षा साबणाचा वापर करावा.
पीएच लेवल
पीएच लेवलच्या बाबतीत लिक्विड सोप साबणापेक्षा जास्त प्रभावी असतात. साबणाच्या वडीची पीएच लेव्हल जास्त असते. साबणाच्या वापराने त्वचा कोरडी पडत असते. तुलनेने लिक्विड सोपचा वापर केल्याने त्वचा चांगली राहते.
सुगंध
(image credit- new york times)
लिक्विड सोपचा वापर केल्यामुळे त्वचेला सुगंध येण्यासाठी तत्व मिळत असतात. पण अनेकदा काही लोकांना जास्त सुगंध आल्यामुळे एलर्जी होत असते. तुलनेने साबणाचा वापर केल्याने सुगंध कमी येतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या एलर्जीचा सामना करावा लागत नाही. ( हे पण वाचा-वाढत्या वयात पांढरे आणि गळणारे केस लूक बिघडवतात? तर 'या' टिप्स वापरून केस नेहमी ठेवा चांगले)
२००९ च्या Institute of Environmental Engineering द्वारे करण्यात आलेल्या अभ्यासानुसार एक गोष्ट समोर आली. ती म्हणजे साबणाच्या लिक्वीड साबणाच्या तुलनेच२ २५ टक्के जास्त कार्बन फुटप्रिंट्स सोडत असतं. याच कारण असं आहे की लिक्विड साबण तयार करण्यासाठी जास्त प्रोसेस करावी लागत असते. याशिवाय लिक्वीड सोपला प्लास्टिकच्या पॅकमध्ये बंद केलं जातं ते पर्यावरणासाठी अनुकूल नसतं. त्यामुळे लिक्विड सोपपेक्षा साबणाचा वापर केल्याने फायदेशीर ठरतं. ( हे पण वाचा-ओठाच्या आजूबाजूच्या मंकी पॅचेसमुळे चेहरा खराब दिसतो? घरच्याघरी 'या' उपायांनी मंकी पॅचेस होतील दूर)