लग्नाच्या बांगड्या खरेदी करताना ‘ही’ काळजी घ्यावीच !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 9:03 AM
नववधूंसाठी हा श्रृंगार तर एक आगळा-वेगळा दागिनाच असतो. म्हणून खरेदी करताना तर काळजी घ्यायलाच हवी...!
भारतीय परंपरेनुसार स्त्रियांच्या सोळा श्रृंगारांपैकी एक प्रकार म्हणजे बांगड्या होय. नववधूंसाठी हा श्रृंगार तर एक आगळा-वेगळा दागिनाच असतो. यामुळे नववधूचा संपूर्ण लूकच आकर्षक वाटतो. महाराष्ट्रात नववधूला हिरव्या रंगाच्या तर पंजाबमध्ये लाल-पाढऱ्या रंगाच्या बांगड्या घातल्या जातात. लग्नप्रसंगी घातलेल्या बांगड्यांना चुडा म्हणतात. * काय आहे चुड्याची परंपरागडद हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या लग्नप्रसंगी मामा नववधूला घालतो, त्याला लग्नचुडा म्हणतात. नववधू जरी खूप ज्वेलरी घालत असली तरी या चुड्यांना खूपच महत्त्वाचे स्थान आहे. इतर महिलाही हिरव्या बांगड्या घालतात, परंतु तो चुडा नसून सामान्य बांगडीच असते. * वर्षभर घातला जातो महाराष्ट्रात आणि पंजाबमध्येही नववधूला वर्षभर हा चुडा घालावा लागतो. परंतु, आजकाल नववधू ४० दिवसच हा चुडा घालतात. हे विवाहित असल्याचे प्रतिक आहे. तसेच प्रजनन आणि समृद्धीचेही संकेत देते. याचबरोबर पतीच्या चांगल्यासाठीही घातले जातात. लग्नप्रसंगी वधूचा आवडता साज म्हणजे लग्नाचा जोडा. कारण लग्नात सर्वांच्या नजरा ह्या वधूकडेच असल्याने आपण आकर्षक दिसावे असे तिला वाटते. मात्र जोड्याबरोबरच बांगड्याही आकर्षक असाव्यात हेदेखील तिला वाटत असते. म्हणून जोड्यावर बांगड्या खुलून दिसण्यासाठी तिचा मनासारख्या बांगड्या खरेदी करण्याकडे कल असतो.* प्लेन बांगड्याआज मार्केटमध्ये विविध प्रकारच्या डिझायनर बांगड्या जरी आल्या असल्या तरी लाल व मरुन रंगाच्या प्लेन बांगड्या ह्या कोणत्याही फॅशनमध्ये सदाबहार दिसतात. विशेष म्हणजे लग्नाच्या जोड्याला ह्या बांगड्या मॅचही होतात. * ड्रेसला मॅचिंगबऱ्याचजणांना प्लेन बांगड्या आवडत नाहीत. त्यांना वेगळा स्टायलिश लूक हवा असतो. यासाठी आपण आपल्याकडे असलेल्या रंगबिरंगी ड्रेसनुसार वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या घेऊ शकता. या तुम्हाला एक खास लूक देतील.* बिकानेरच्या बांगड्यालाल आणि मरून रंगाच्या बिकानेरच्या बांगड्या उत्तर भारतात लग्नात वधूने वापरणे शुभ मानले जाते. या बांगड्या आपणही वापरुन लग्नप्रसंगी वेगळा लूक मिळवू शकता. या बांगड्यांचे वैशिट्य म्हणजे ह्या चमकदार असतात.