गॉगल खरेदी करताना ...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2016 3:05 PM
ऊन व धुळीपासून संरक्षण करण्यासाठी सलग्लास लावणे गरजेचे आहे.
चेहºयापेक्षा डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु, अनेकजण चेहºयांवरच जादा लक्ष केंद्रित करतात. डोळे हे फार नाजूक आहेत.काहीजण डोळ्यांच्या संरक्षणापेक्षा सनग्लासचा फॅशन म्हणून जास्त यूज करतात.डोळ्यांची खासकरुन, सकाळी व संध्याकाळी काळजी घ्यावी. सूर्यकिरणे हे डोळ्यासाठी फार नुकसानकारक असतात. त्यामुळे बाहेर पडायचे म्हटले तर सनग्लास आवश्यक लावावे.लहान मुले व ज्यांची डोळे निळे आहेत, त्यांनी जास्त सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.केवळ उन्हातच गॉगल्स लावून बाहेर पडून नये तर ढगाळ वातावरण असल्यावर सुद्धा डोळ्यांना गॉगल्स लावणे आवश्यक आहे.याकरिता उत्तम ब्रॅण्डचा ग्लास खरेदी करणे आवश्यक आहे. पण केवळ चांगला सनग्लास खरेदी केला म्हणूनच त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. त्यासाठीसनग्लासची फ्रेम ही सुद्धा पाहूनच खरेदी करावी. फ्रे म चांगली नसेल तर उन्हामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.