कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी आणि लोकांना सुरक्षित ठेवण्याासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता कोणतंही दुकानं, सलून, पार्लर उघडण्यात आलेले नाही. त्यामुळे पुरुषांना केस कापण्याची आणि दाढी करण्याची खूप घाई झाली आहे.
तुम्ही याआधी कधीही न केलेली किंवा तुम्हाला न जमलेली कामं तुम्ही या कालावधीत करू शकता. अनेकदा तुम्हाला काही करायचे असतं,पण गडबडीत राहून जातं. तुम्हाला जर बिअर्डमॅन बनायचं असेल म्हणजेच दाढी वाढवायची असेल तर लॉकडाऊनचा कालावधी उत्तम आहे. आज आम्ही तुम्हाला लॉकडाऊनचा कालावधी का उत्तम आहे. याबाबत सांगणार आहोत.
कोणतंही बंधन नाही
कॉर्पोरेटमध्ये काम करत असलेल्य लोकांना आपल्या ड्रेस कोडचं पालन करावं लागतं. अनेक ठिकाणी दाढी वाढवायची परवानगी नसते. काही ठिकाणी शेविंग करून येण्याच्या सुचना दिल्या जातात. पण आता तुम्ही पूर्णवेळ घरी असल्यामुळे स्वतःच्या मनाप्रमाणे दाढी वाढवू शकता. लॉकडाऊन संपल्यानंतर तुम्हाला वाटल्यास दाढीला योग्य शेप देता येईल. हवा तसा लूक मिळवून तुम्ही सोशल मीडियावर आपले फोटोज टाकू शकता.
पिंपल्स मुरमं येत नाहीत
जर तुमच्या स्किनवर पिंपल्स येत असतील किंवा त्वचेशी निगडीत इतर समस्या असतील तर बिअर्ड ठेवणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण सतत शेविंग केल्यामुळे त्वचेची सालं निघत असतात. त्यामुळे त्वचेवर जळजळ होणं, रॅशेज, त्वचा लाला होणं, इन्ग्रोथ हेअरर्स अशा समस्या उद्भवतात. पण जर तुम्ही लॉकडाऊनच्या काळात दाढी वाढवाल तर त्वचेच्या समस्या उद्भवणं कमी होईल.
त्वचा हेल्दी राहते
शेविंग केव्यामुळे त्वचेतील रोमछिद्र ओपन होतात, या व्यतिरिक्त त्वचेचा एक थर सुद्धा काढला जातो. कोरडी त्वचा असलेल्या लोकांना दाढी ठेवण्यासाठी अडचड निर्माण होते. बिअर्डमुळे तुमचा संपूर्ण लूक बदलतो. अनेकदा तुमच्या चांगल्या स्मार्ट लुकमुळे लोक तुमच्या स्टाईलचं अनुकरण करतात. तुमचं कौतुक करतात. फक्त बिअर्ड ठेवायची स्टाईल चांगली आणि आकर्षक असायला हवी. ( हे पण वाचा-घरी शेविंग करताना सर्वाधिक पुरूष करतात 'या' चुका, परफेक्ट शेविंगसाठी खास टिप्स)
बिअर्डमुळे सुरुकुत्या लपवल्या जातात
जर तुमच्या त्वचेवर सुरकुत्या येत असतील तर काही दिवसांनी त्वचा लटकत असलेली किंवा वयस्कर व्यक्तीप्रमाणे दिसते. तुम्हाला फाईन लाईन्स आणि सुरकुत्या लपवायच्या असतील तर तुम्ही बिअर्ड ठेवायला हवी. कारण त्यामुळे चेहरा वयस्कर दिसून येत नाही. याशिवाय सॉल्ट एंड पेपर बियर्ड सध्या लेटेस्ट बिअर्ड ट्रेंडमध्ये आहे. ( हे पण वाचा-प्रत्येक पुरुषाला हॅण्डसम लूक देतील 'हे' घरगुती फंडे, लॉकडाऊनमध्ये नक्की ट्राय करा)