वातावरणातील बदलांचा परिणाम शरीरावर होत असतो. सध्या कोरोनाची माहामारी असल्यामुळे आजारपणाची जास्त भीती सगळ्यांनाच वाटते. कारण ११ महिन्यानंतरही कोरोनाचा प्रसार पूर्णपणे थांबलेला नाही. कोरोनाकाळात तब्येत चांगली राहण्यासाठी तसंच रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत आहेत. पोषक आहार, काढा पिणं, हळदीचं दूध, गरम कपडे, वाफ घेणं या उपयांचा अवलंब केला जात आहे.
थंडीच्या दिवसात सर्दी, खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी तसंच घश्याच्या समस्येसाठी लोक गरम पाण्याची वाफ घेतात. तर काहीजण त्वचेची काळजी घेण्यासाठी मसाज करण्याआधी वाफ घेतात. आज आम्ही तुम्हाला वाफ घेतल्याने शरीराला होणारे फायदे आणि वाफ घेण्याची योग्य पद्धत सांगणार आहोत.
वाफ घेण्याची योग्य पद्धत
१) तुमच्याकडे वाफ घेण्याची मशीन नसेल तर एका भांड्यात ३ ग्लास पाणी टाकून झाकून ठेवा.
२) हे ५-१० मिनिटे गरम होऊ द्या. यानंतर डोक्यावर एक कॉटनचा टॉवेल घ्या आणि भांड्यावरील झाकण काढून ५ ते १० वाफ घ्या. वाफ घेताना तोंडाला चटका बसणार नाही याची काळजी घ्या.
३) आढवड्यातून दोन ते तीनवेळा ही पद्धत रिपीट करा.
फायदे
थंडीच्या दिवसात चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास सर्दी, खोकला या सारख्या आजारांपासून आराम मिळतो. हिवाळ्यात कोरडी झालेली त्वचा मऊ होते. चेह-यावरील त्वचेवर चकाकी येते तसंच चेह-यावर आलेले डेड सेल्स नाहीसे होतात आणि चेह-यावरील त्वचा मोकळी होते. रोज वा आठवड्यातून २-३ दिवस चेह-यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यास त्वचेची घाण दूर होते. पिंपल्स प्रॉब्लेम नियंत्रणात राहण्यास मदत होते.
काळ्या डागांनी चेहऱ्याचा लुक बिघडलाय? ग्लोईंग, आकर्षक त्वचेसाठी एक्सपर्ट्नी दिले ७ सोपे घरगुती उपाय
वाफ घेतल्यानं धुळ, प्रदूषणावर चेह-यावर चिकटलेली घाण स्वच्छ होते आणि चेह-याला ग्लो येतो. नियमित गरम वाफ घेतल्यास श्वसनाचा त्रास कमी होतो. नाक चोंदले असल्यास गरम वाफ नाकात जाऊन नाक मोकळे होते आणि श्वासोच्छवास सुरळीत सुरु राहते. वाफ घेतल्याने पिंपल्स पसरविणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि त्वचा पुन्हा श्वास घेऊ लागते. घरच्याघरी वाफ घेतल्याने विनाकारण स्क्रबिंग करण्यापासून सुटका मिळते.
ना पार्लरचं टेंशन, ना खर्चाची कटकट; घरच्याघरी केळ्याच्या वापराने 'अशी' मिळवा सुरकुत्यांपासून सुटका
स्टीम घेतल्यानंतर एक -दोन दिवसानंतर पिंपल्सने भरलेला चेहरा थोडा खराब वाटू शकतो. पण काही दिवसानंतर आपला चेहरा सुंदर दिसू लागतो. आपल्या चेहऱ्यावरचे सर्व डाग नाहीसे होतात आणि चेहरा खूप स्वच्छ दिसू लागतो. थंडीत अनेकजणांची त्वचा कोरडी होते. अशावेळी स्टीमिंग केल्यास त्वचेचा कोरडेपणा दूर होऊन चेहऱ्याची चमक वाढते.