थंडीमध्ये त्वचा कोरडी पडते त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अधिक थंडीमुळे त्वचा निस्तेज होते. त्यामुळे चेहऱ्यवरील उजाळाही नाहीसा होतो. फक्त चेहऱ्यावरच नाही तर ओठांवरही थंडीचा परिणाम होतो. अशातच त्वचेची आणखी काळजी घेणं गरजेचं असतं. परंतु हिवाळ्यामध्ये पार्लरमध्ये जाऊन ब्युटी पॅकेज घेणं म्हणजे चॅलेंज असतं आणि खिशाला कात्री लागणार ती वेगळीच.
आज आम्ही तुम्हाला एका हर्बल फेशिअलबाबत सांगणार आहोत. हे फेशिअल किट घरी तयार करून तुम्ही घरच्या घरीच फेशिअल करू शकता. हर्बल फेशिअलमुळे तुम्हाला नॅचरल ग्लो मिळतोच आणि चेहऱ्यावर उजाळाही येतो.
हर्बल फेशिअल तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
- 2 ते 3 चमचे मध
- 2 ते 3 चमचे ओट्स किंवा तांदूळ
- किसलेला बटाटा
- नारळाचं दूध
- ग्रीन टी बॅग 3
- पपई
- स्ट्रॉबेरी
- 2 चमचे ऑलिव्ह ऑइल
- 2 चमचे बदामाचं तेल
- आइस क्यूब्स
- टॉवेल किंवा टिशू पेपर
हर्बल फेशिअल करण्याच्या 5 स्टेप्स :
स्टेप 1 : चेहरा स्वच्छ करा
सर्वात आधी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून स्वच्छ टॉवेलने चेहरा पुसून घ्या. 2 मिनिटांनी किसलेला बटाटा हातावर घेऊन गोलाकार फिरवत मसाज करा. असं कमीतकमी 5 मिनिटांसाठी करा. त्यानंतर टिशू पेपरच्या सहाय्याने चेहरा स्वच्छ करून घ्या.
स्टेप 2 : स्क्रबिंग
पपई आणि ओट्स एकत्र करून स्क्रब तयार करा. पपईचा पल्प तयार करून घ्या. त्यामध्ये ओट्स आणि पिठ एकत्र करून स्क्रब करा. या स्क्रबने चेहऱ्यावर 4 ते 5 मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्यानंतर पेस्ट चेहऱ्यावर 2 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि त्यानंतर टिश्यू पेपर पाण्यामध्ये भिजवून चेहरा स्वच्छ करा.
स्टेप 3 : टोनिंग
एका पॅनमध्ये पाणी आणि ग्रीन टीच्या 3 बॅग एकत्र करून पाणी व्यवस्थित उकळून घ्या. उकळलेल्या पाण्याने चेहऱ्याला वाफ द्या. कमीत कमी 5 मिनिटांपर्यंत वाफ घ्या. असं केल्याने चेहऱ्यावरील पोर्स ओपन होतील. त्यामुळे ब्लॅकहेड्स रिमूव्ह करणं सोपं होतं.
स्टेप 4 : मॉयश्चराइज
आता मध घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. हे एखाद्या जेलप्रमाणे काम करेल. 2 मिनिटांपर्यंत मसाज केल्यानंतर याच जेलवर लिव्ह ऑइल आणि बदामाचं तेल एक एक करून लावून मसाज करा. मसाज केल्यानंतर ओल्या टिश्यू पेपरने चेहरा स्वच्छ करा.
स्टेप 5 : फेस पॅक
सर्वात शेवटी चेहऱ्यावर फेस पॅक लावा. फेस पॅक तयार करण्यासाठी एका मिक्सरमध्ये स्ट्रॉबेरी, तांदळाचं पिठ, मध एकत्र करून घ्या. हे सर्व एकत्र केल्यानंतर तयार पेस्ट चेहऱ्यावर जवळपास 15 मिनिटांसाठी लावून ठेवा. या पेस्टमध्ये वापरण्यात आलेल्या स्ट्रॉबेरीमुळे चेहऱ्याला गुलाबी रंग मिळण्यास मदत होईल आणि तांदळाचं पिठ किंवा मध चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाऊन टॅन कमी करण्यास मदत होईल.