जागतिक आरोग्य संघटना म्हणते, बिनधास्त कॉफी प्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2016 5:26 PM
जागतिक आरोग्य संघटनेने कॉफीला कॅन्सरसाठी कारणीभूत पदार्थांच्या यादीमधून तिला वगळले
अलिक डच्या काळात कॉफीचे अनेक लाभ विविध संशोधनांतून समोर आले आहेत. ‘सीएनएक्स’ने देखील तुम्हाला यापूर्वी सांगितले आहे की, दोन कप अधिक कॉफी पिणाऱ्या लोकांचे लिव्हर (यकृत) खराब होण्याची शक्यता ४४ टक्क्यांनी कमी असते.परंतु साधारण असा समज अधिक दृढ आहे की, कॉफी पिणे आरोग्यासाठी घातक आहे. एवढेच कशाला, कॉफीमुळे कॅन्सरदेखील होऊ शकतो असे जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) मानायची. अखेर २५ वर्षांनंतर का होईना, जागतिक आरोग्य संघटनेने कॉफीला आरोग्यासाठी लाभदायक म्हटले असून कॅन्सरसाठी कारणीभूत पदार्थांच्या यादीमधून तिला वगळण्यात आले आहे.‘डब्ल्यूएचओ’तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस रिलिजमध्ये सांगण्यात आले की, २३ वैज्ञानिकांच्या पॅनलने एक हजारांपेक्षा जास्त संशोधन-अध्ययनांचा अभ्यास केला असता कॉफीमुळे कॅन्सर होता याचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.आता कॉफी पिल्याने जरी थेट कॅन्सर होणार नसला तरी अतिउष्ण पेय पिल्याने होऊ शकतो, असा ‘डब्ल्यूएचओ’ने इशारा दिला आहे. ६५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त गरम पेय पिल्याने एसोफेगिअल कॅन्सर होण्याची शक्यता असते. पेयाचे तापमान आणि कर्करोगाचा संबंध असतो. चीन आणि इराणमध्ये अधिक गरम पेय पिण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तिथे अशा प्रकारचा कॅन्सरही इतर देशांच्या तुलनेत जास्त आढळतो.‘नॅशनल कॉफी असोसिएशन’च्या मार्गदर्शकतत्त्वांनुसार, कॉफी बनवताना पाणी 90 ते 96 डिग्री सेल्सियस एवढे तापवावे आणि मग कॉफी सामान्य तापमानापर्यंत थंड झाल्यावरच प्यावी. अधिक वाचा :कॉफीमुळे येतो सहजपणाडोळ्याच्या आरोग्यासाठी कॉफी लाभदायक