जागतिक 'हृदय दिवस' विशेष !!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2016 5:54 AM
भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेला हृदयरोग याबाबत बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी हे मुख्य कारण होऊ पाहत आहे....
-रवींद्र मोरे भारतात दिवसेंदिवस वाढत चाललेला हृदयरोग याबाबत बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी हे मुख्य कारण होऊ पाहत आहे. तज्ज्ञांचे मते आजच्या तरुणाईनेही हृदयरोगाविषयी विशेष खबरदारी घेतली पाहिजे. या आजाराविषयी जनजागृतीसाठी दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदयरोग दिवस साजरा केला जातो. याबाबत सीएनएक्सने घेतलेला आढावा. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)च्या रिपोर्टनुसार २०२० पर्यंत भारतात होणारे मृत्यु आणि अपंगत्वाला सर्वात मोठे कारण म्हणजे हृदयरोग होय. बीएलके सुपर स्पेशियलिटी हॉस्पिटल मधील हृदय केंद्राचे वरिष्ठ सल्लागार आणि निदेशक नीरज भल्ला यांच्या मते, हृदयरोग पिडीत व्यक्तिचे दिवसेंदिवस आयुष्य कमी होत चालले आहे. वयाच्या २० व्या वर्षीच बरेच लोक हृदयरोगाने ग्रस्त होत आहेत. पुढील पाच ते दहा वर्षात एकुण भारतीय लोकसंख्येच्या सुमारे २० टक्के भाग हा हृदयरोगाने त्रस्त असेल, असेही ते म्हणाले. तज्ज्ञांच्या मते आजची तरुणाई नोकरी किंवा व्यवसायात अनियमित तासिकात काम करते. याच कारणाने त्यांच्यात ताणतणाव वाढतो आणि विशेष म्हणजे बºयाचजणांना घरचा स्वयंपाकदेखील मिळत नाही. याच कारणाने जास्तीचा ताण वाढतो आणि व्यसनाच्या आहारी म्हणजेच धूम्रपान आणि मद्यपानास सुरुवात होते. याप्रकारच्या जीवनशैलीमुळे रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेहसारखे आजार बळावतात आणि याचे रुपांतर हृदयरोगात होते. हृदयरोगापासून मुक्ततेसाठी सर्वप्रथम तरुणाईत मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठी तरुणाईनेही पुढाकार घेत व्यायाम करणे, जंक फूड आणि तळलेले पदार्थ तसेच धूम्रपानापासून स्वत:ला लांब ठेवत हृदयरोगापासून स्वत:ला वाचविले पाहिजे. विशेषत: पालेभाज्या, मासे, फळे आणि कडधान्ये यांचा समावेश असलेल्या सकस आहाराचे सेवन केले पाहिजे. यामुळे हृदयरुग्णांच्या मृत्यूचा धोका कमी होत असल्याचा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात करण्यात आला आहे.सकस आहार हा जगभरात आरोग्यासाठी लाभदायक आहार असल्याचे इटलीतील आयआरसीसीएस न्यूरोम संस्थेच्या गिओव्हॅनी दे गायेतानो यांनी सांगितले. या आहारामुळे विविध आजारांचा धोका कमी होतो, त्यामुळेच प्रत्येकालाच असा सकस आहार देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे हृदयरोग असलेल्यांना हा आहार देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब हा आजार असलेल्यांना सकस आहार दिल्यास त्यांना असलेला जिवाचा धोका २१ टक्क्यांनी कमी झाल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदविले. कमी सकस आहार घेणाºयांना जिवाचा धोका अधिक असल्याचेही निरीक्षण नोंदविले गेले आहे.पालेभाज्या, मासे, फळे, कडधान्ये यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील घातक आम्ल नष्ट होऊन रुग्णांना त्याचा लाभ होत असल्याचे संशोधक मारिआलॉरा बोनॅसिओ यांनी सांगितले. हृदयाच्या काळजीसाठी हे करा...* थोडा वेळ व्यायामासाठी काढा* दर दिवशी कमीतकमी अर्धातास व्यायाम करणे हृदयासाठी फायदेशीर आहे. * वेळेचा अभाव असेल तर आपण चालू शकता.* प्रकृतीनुसार आहार घ्या* मीठाचे कमी प्रमाणात सेवन करा. * ताजे फळे आणि भाजीपाला खावेत. * नास्ता आणि जेवण वेळेवर करा. * तंबाकूपासून लांब रहा.* कित्येक तास एकाच स्थितीत बसणे हृदयासाठी अपायकारक ठरु शकते. * आयुष्यात येणाºया ताणतणावाला चारहात लांब ठेवा.