(Image Crdit : transitionsalon.co.uk)
उन्हाळ्याची चाहूल लागली असून बाजारांमध्ये समर स्पेशल आउटफिट्स बाजारातही दाखल झाले आहेत. जर तुम्हीही खास उन्हाळ्यासाठी शॉर्ट ड्रेसेसचा विचार करत असाल आणि तुमच्या गुडघ्यांचा काळेपणा या चॉईसमध्ये अडथळा बनत असेल, तर आता टेन्शन घेऊ नका. कारण आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. आपल्या शरीराच्या अवयवांपैकी हाताचे कोपर आणि गुडघ्यांवर सर्वत जास्त काळपटपणा दिसून येतो. खरं तर गुडघे सहज दुमडता यावे, यामुळे याभागातील त्वचा लवचिक असते. ज्यावेळी ही त्वचा एकत्र होते, तेव्हा याभागांमध्ये थोडा काळपटपणा दिसू लागतो. पायांच्या तुलनेत गुडघ्यांचा रंग थोडा काळपट असणं सामान्य आहे. परंतु याभागत जर जास्त काळपटपणा जाणवू लागला तर मात्र त्यावर उपाय करणं आवश्यक ठरतं. अन्यथा ते तुमच्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण करू शकतं. जाणून घेऊया गुडघ्यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी काही खास टिप्स...
ऑलिव ऑइल
ऑलिव्ह ऑइलच्या मदतीने तयार करण्यात आलेलं स्क्रब गुडघ्यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. यासाठी दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करा. तयार मिश्रण गुडघ्यांवर लावून सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करा. यानंतर जवळपास पाच मिनिटांसाठी असचं ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका.
लिंबाचा रस
लिंबाचा रस एक प्राकृतिक ब्लिचिंग एजेटंचं काम करतो. त्यामुळे गुडघ्यांचा काळपटपणा दूर करण्यासाठी याचा वापर करण्यात येऊ शकतो. याचा वापर करण्यासाठी लिंबाचा रस गुडघ्यांवर लावा आणि जवळपास एक तासांसाठी असंच ठेवा. त्यानंतर पाण्याने धुवून टाका. तुम्ही हा उपाय दररोज करू शकता.
बेकिंग सोडा
एक टेबलस्पून बेकिंग सोड्यामध्ये एक टेबलस्पून दूध एकत्र करा. आता तयार मिश्रण गुडघ्यांवर लावून हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये जवळपास दोन ते तीन मिनिटांसाठी स्क्रब करा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका. तुम्ही एकदिवसाआड हा उपाय करू शकता. बेकिंग सोडा स्किनला एक्सफोलिएट करण्यासोबतच डेड स्किन सेल्स काढून टाकण्यासाठीही काम करतात. त्यामुळे त्वचेचा काळपटपणा दूर होतो.
खोबऱ्याचं तेल
एक टेबलस्पून खोबऱ्याचं तेल घेऊन त्यामध्ये एक टेबलस्पून अक्रोडची पावडर एकत्र करून पेस्ट तयार करा. आता या पेस्टने 2 ते 3 मिनिटांसाठी स्क्रब करा. त्यानंतर पाण्याच्या मदतीने हे स्वच्छ करा. स्वच्छ केल्यानंतर त्यानंतर खोबऱ्याचं तेल गुडघ्यांवर लावा. खोबऱ्यांचं तेल त्वचा हायड्रेट आणि मॉयश्चराइज करतात. ज्यामुले त्वचेचा कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा लाइट होते.
कोरफडीचा गर
कोरफडीचा गरही गुडघ्यांचा काळेपणा दूर करण्यासाठी मदत करतो. याचा वापर करण्यासाठी कोरफडीची ताजी पानं तोडून त्यांचं जेल काढून घ्या. आता हे जेल गुडघ्यांवर लावून पंधरा ते वीस मिनिटांसाठी तसचं ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून टाका.