आनंदी जीवन जगण्यासाठी योगा..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2016 9:36 AM
आनंदी जीवन जगण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे
.आजच्या या धावपळीच्या युगात आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे प्रत्येकजण विविध प्रकारच्या व्याधीने त्रस्त आहेत. याकरिता आनंदी जीवन जगण्यासाठी योगा हा उत्तम पर्याय आहे. योगामुळे मानवाच्या सर्वागीण व्यक्तिमत्वाचा विकास होतो. जीवन आनंदी, उत्साही व निरोगी ठेवण्यासाठी योगाची खूप आवश्यकता आहे. त्यामुळे सेलिब्रेटी सुद्धा योगाच्या वर्गाला दररोज वेळ काढतात. योगा हा आजघडीला कसा आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत. योगाचे दहा फायदे १ उत्तम आरोग्य : केवळ तुमचे शरीर निरोगी असून, चालत नाही. त्याकरिता मानसीक व भावीनक आरोग्यही उत्तम असणे आवश्यक आहे. जीवनात आनंद व उत्साह असला तरच तुम्हाला कोणतेही यश संपादन करता येते. त्याकरिता प्राणायम, ध्यान व धारणा या गोष्टी कराव्यात. त्यामुळे मन सुद्धा शांत राहते. २ वजन कमी करण्यासाठी : दररोज नियमीत योगाचा सराव केला तर वजन हे हमखास कमी होते. तसेच आपल्या शरीराला कधी व कोणत्या अन्नाची गरज आहे. याची सुद्धा यामुळे जाणीव निर्माण होते. ३ तणावमुक्ती : दररोजचा ताण तणाव घालविण्यासाठी योगासने, प्राणायम, व ध्यान धारण ही तणाव नष्ट करणारी महत्वाची तंत्रे आहेत. त्याकरिता नियमीत योगाचा सराव करणे आवश्यक आहे. ४ शांतता : मनाला शांती मिळण्यासाठी दररोजच्या कामातून वेळ काढावा. सुटीमध्ये दररोज योग व ध्यान केल्याने, मनाला एकदम शांती मिळते. त्या शांतीमुळे आपल्याला विविध प्रकारचे फायदे होतात. तसेच अस्वस्थ झालेल्या मनाला काबूत आणण्यासाठी योगासारखा दुसरा पर्याय नाही. ५ रोगप्रतिकारक शक्ती वाढते : योगा केल्यामुळे आपल्या शरीरातील स्नायू हे बळकट होतात. त्यामुळे शरीरातील ताण तणाव निघून जाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ६ सजगतेत वाढ : आपले मन हे नेहमी भूतकाळ किंवा भविष्याकाळात असते. या विचाराने सध्या काय सुरू आहे, हे सुद्धा अनेकजण विसरुन जातात. आपण जर नियमीत योगा व प्राणायम करीत असाल तर आपल्या सजगतेत वाढ होते. तसेच आनंदी राहून मनाची एकाग्रताही वाढते. ७ नात्यात सुधारणा : तुमचे घरात आई वडिल, पत्नी, बाहेर मित्र यांच्यासोबत नेहमी खटके उडत असेल तर ते योगामुळे सुधारतात. मन हे शांत असल्याने सर्वांसोबत तुमचे संबंध चांगले प्रस्थापित होऊन, नात्यात सुधारणा होते. ८ उत्साह वाढतो : दिवसभर कामाच्या व्यापामुळे चेहºयावर कोणताही उत्साह राहत नाही. परंतू, तुम्ही जर नियमीत योगाचा सराव केला तर दिवसभर ताजेतवाने व उत्साही राहू शकता. कामातून दहा मिनीटे वेळ काढून, ध्यान केले तर काम करण्यासाठी आणखी उत्साह येतो. ९ स्नायू बळकट होतात : दररोज न चुकता योगा केला तर स्नायूंना बळकटी येऊन, शरीराची ठेवन सुधारते. तसेच शरीर सशक्त, चपळ व लवचीक बनते. अंगदुखण्याचा त्रासही थांबतो. १० अंतज्ञार्नात वाढ : योगा केल्यामुळे आपल्या अंतज्ञार्नात वाढ होते. याची अनुभूती आपल्या घ्यावयाची असेल तर आवश्य योगा करावा. शिल्पा शेट्टीबॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सुद्धा गतवर्षी आंतरराष्ट्रीया योगा दिनाच्या निमित्ताने बंगळूर येथे रामदेव बाबा यांच्यासोबत शिबिरात सहभागी झाली होती. तसेच मुंबई येथे सुद्धा ती रामदेव बाबांच्या सोबत एका शिबीरात सहभागी होऊन, तिने लोकांना योग शिकविला. तिने योगावर लिहीलेले ‘ग्रेट इंडियन डायट’ या पुस्तकाचे प्रकाशनही रामदेव बाबांच्या हस्ते करण्यात आले. सोशल मिडीयावर या दोघांच्या फोटोनी धूम केली होती. यावरुन सेलिब्रेटीही आरोग्य उत्तम राहावे, याकरिता योगा करण्यासाठी सजग असल्याचे दिसून येते.