बीड : राज्य सरकारने घोषित केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शनिवारी जिल्ह्यातील १३२४ गावांतील पात्र शेतक-यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधित शेतक-यांना आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे.२४ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील तेलगाव आणि माजलगाव तालुक्यातील नित्रूड येथील ६५५ शेतक-यांची यादी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर शनिवारी यादी प्रसिद्ध झाली. सदर याद्या बॅँका, सेवा संस्था कार्यालय, आपले सरकार सेवा केंद्रात लावण्यात आल्या असून तेथे लॉगिन करुन शेतक-यांनी त्यांच्या आधार, बॅँक खाते क्रमांक, कर्ज रक्कम याबाबत खात्री केल्यानंतर आधार प्रमाणीकरण होऊन शासनाकडे आॅनलाईन माहिती जाणार आहे. माहितीबाबत खात्री पटवून ती मान्य असल्याची नोंद करणाºया पात्र शेतक-याच्या कर्ज खात्यात रक्कम जमा होणार आहे.बीड जिल्ह्यात या योजनेंतर्गत ३ लाख ३ हजार ९२५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. त्यापैकी २ लाख ८२ हजार ९५ कर्जखात्यांची माहिती अपलोड केलेली आहे. या माहितीनुसार विशिष्ट क्रमांक १ लाख ९० हजार ५५९ खात्यांना देण्यात आलेला आहे. तर निकषानुसार अपात्र कर्जखाती २४११ इतके आहेत.आतापर्यंत आले २ कोटीमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नाव आणि विशिष्ट क्रमांक, आधार कार्ड, बॅँक पासबुक घेऊन शेतक-यांनी तातडीने लॉगिन करावे. आधार प्रमाणीकरणानंतर २४ तासात त्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यातील पात्र ३३७ शेतक-यांच्या आधार प्रमाणीकरणानंतर २ कोटी रुपये लाभ हस्तांतरण झाल्याचे जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी सांगितले.२४११ खात्यांचेच आधार प्रमाणीकरणया कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत २४११ कर्जखात्यांचे संबंधित शेतक-यांकडून आधार प्रमाणीकरण झाले आहे. १ लाख ८८ हजार १४८ खात्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप शिल्लक आहे.
बीड जिल्ह्यातील ३३७ शेतकऱ्यांचे २ कोटी रुपये कर्जखात्यात जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:55 PM
बीड : राज्य सरकारने घोषित केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शनिवारी जिल्ह्यातील १३२४ गावांतील पात्र शेतक-यांची यादी ...
ठळक मुद्दे१३२४ गावांतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध । आतापर्यंत २४११ शेतक-यांचेच आधार प्रमाणीकरण