बीड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ६५५ शेतकºयांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आधार प्रमाणिकरण करताना २६ शेतक-यांनी माहिती अमान्य केली. तक्रारीनुसार लवकरच निराकरण केले जाणार आहे. तर २२२ शेतक-यांच्या कर्जमाफीचे एक कोटी रुपये मंजूर झाले असून ही रक्कम संबंधित शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार आहे. शुक्रवारी होऊ न शकलेली कर्जमाफीची दुसरी यादी शनिवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.बीड जिल्ह्यात या योजनेंतर्गत ३ लाख ३ हजार ९२५ शेतकरी पात्र आहेत. २४ फेब्रुवारी रोजी नित्रुड व तेलगाव येथील ६५५ शेतकºयांची पहिली यादी प्रसिध्द झाल्यानंतर शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण करुन आधार क्रमांक, खाते क्रमांक, बॅँक, कर्ज रक्कम आदी माहितीची खात्री केली. दरम्यान शुक्रवारी दुस-या यादीची प्रतीक्षा होती. जिल्हा उपनिबंधकांसह यंत्रणेतील अधिकारी दिवसभर प्रतीक्षा करत होते. मात्र दुसरी यादी पोर्टलवर दिसून आली नसल्याचे सांगण्यात आले.यादीत नाव असलेल्या शेतक-यांना आपले सरकार केंद्रात जावून खात्री करावयाची आहे. शासनामार्फत संबंधित केंद्रांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.२६ शेतक-यांच्या तक्रारी२४ फेब्रुवारी रोजी पहिल्या यादीतील २६ शेतक-यांनी लॉगिन करून पोर्टलवरील खात्री करताना माहिती अमान्य असल्याचे म्हटले होते. पोर्टलवर याची तक्रार नोंद झाली. यातील २३ तक्रारी या आधार क्रमांकाबाबत आहेत. तर ३ तक्रारी या आधार क्रमांक व कर्ज रकमेबाबत असल्याचे जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी लोकमतला सांगितले.जिल्हा समिती करणार निराकरणप्राप्त झालेल्या २६ तक्रारींचे जिल्हा समिती निराकरण करणार आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात बॅँक अधिकारी तसेच इतर अधिका-यांच्या दररोज बैठक होऊन या तक्रारींची शहानिशा करुन निराकरण केले जाणार आहे.यादी प्रसिद्धीनंतर प्रमाणीकरण करापात्र शेतक-यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बॅँका, चावडी, सोसायटीच्या ठिकाणी डकविल्या जाणार आहेत. त्यानुसार नाव वाचून आपले सरकार सेवा केंद्रात आधार कार्ड व बॅँक खात्याचे पासबुक घेऊन लॉगिन करुन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे. संपूर्ण खात्रीनंतर माहिती मान्य असेल तर आधार प्रमाणिकरण नोंद झाल्याचे पत्र मिळणार आहे. आधार प्रमाणिकरण होताच चार- सहा दिवसात कर्जखात्यावर रक्कम जमा होणार आहे.
२२२ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १ कोटी रूपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:43 PM
बीड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ६५५ शेतकºयांची पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आधार प्रमाणिकरण करताना २६ शेतक-यांनी ...
ठळक मुद्देमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना : पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता