लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस लाभदायक ठरत असल्याचे आकडेवारीवरून समोर आलेले आहे. असे असले तरी अद्यापही १ लाख लोकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. नागरिकांची उदासिनता आणि अपुरा लससाठा ही याची दोन मुख्य कारणे आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ९ लाख लोकांनी लस घेतली आहे. यातील दुसरा डोस घेणाऱ्या लोकांची संख्या नगण्य आहे. कोविशिल्डला ८४ दिवस आणि कोव्हॅक्सिनला २९ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असतानाही लोक दुसरा डोस घेत नसल्याने कोरोना कमी होणार का? असा सवाल आहे.
नेमकी अडचण काय?
दुसऱ्या डोसची तारीख आल्यावर लोक केंद्रावर जातात. परंतु लस उपलब्ध नाही, असे सांगितले जात असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. त्यामुळे लोक केंद्रावर रिकामी चक्कर होते, असा समज ठेवून लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरा डोस घेणेही तितकाच आवश्यक
n पहिला डोस घेतल्यानंतर काही लोकांना ताप, अंगदुखी, चक्कर येणे असा त्रास झाला. त्यामुळे ते घाबरून गेलेले आहेत.
n परंतु लस घेतल्याने अशी लक्षणे दिसणे नियमित आहे. पहिल्या डोसप्रमाणेच दुसरा डोस घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
आम्ही संपर्क करतो
दुसऱ्या डोसची मुदत आली की आम्ही त्यांना संपर्क करतो. आम्ही गाव, प्रभागनिहाय याद्या केल्या आहेत. लसीचा तुटवडा आहेच, परंतु लस उपलब्ध असल्यावर दुसरा डोसवाल्यांना प्राधान्य देतो.
- डॉ. नरेश कासट, तालुका आरोग्य अधिकारी, बीड
010921\01_2_bed_15_01092021_14.jpeg
डॉ.नरेश कासट, तालुका आरोग्य अधिकारी बीड