शहरं
Join us  
Trending Stories
1
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
2
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
3
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
4
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
5
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
6
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
7
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
8
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
9
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
10
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
11
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
12
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
13
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने शोधला एलियन्सचं वास्तव्य असलेला ग्रह, संशोधनानंतर केला दावा
14
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
15
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
16
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
17
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळालेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
18
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
19
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
20
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टीमेट; दखल न घेतल्यास सामूहिक अन्नत्याग आंदोलन करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 22:13 IST

संतोष देशमुख हत्या प्रकरण: मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला थेट इशारा

केज(बीड)- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटले, पण अद्याप ठोस कारवाई झाली नाही. यामुळे आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय देशमुख यांच्या भेटीनंतर सर्वत्र उलट-सुलट चर्चेला उधाण आल्याच्या पार्शवभूमीवर सोमवारी(दि.17 फेब्रुवारी) रात्री 8 ते 9 या दरम्यान मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर गावाकऱ्यांची बैठक झाली. 

सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूरपणे हत्या केली, त्याला 70 दिवस झाले तरीही कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. याबद्दल सोमवारी रात्री मस्साजोग येथील महादेव मंदिरासमोर झालेल्या बैठकीत गावाकऱ्यांच्या बैठकीत प्रशासनावर नाराजीचा सूर उमटला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गावकऱ्यांनी हल्ला चढवीला. प्रशासनाला 10 दिवसाचा अल्टीमेट देण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यानंतर गावाकऱ्यांनी सामूहिक अन्न त्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय, मुख्यमंत्री व राज्यपाल यांना निवेदन देण्याचेही बैठकीत ठरले 

बैठकीतील मागण्या.-गावाकऱ्यांच्या बैठकीत केजचे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करुन त्यांना सह आरोपी करण्यात यावे.-70 दिवसापासून फरार आसलेल्या कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी.-हे प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालविण्यात यावे व सरकारी वकील म्हणून अॅड उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. -आरोपीना पळून जाण्यासाठी व इतर प्रकारची मदत करणाऱ्या सर्व आरोपीचे सीडीआर काढून त्यांनाही याप्रकरणात सह आरोपी करण्यात यावे.-अवादा एनर्जी कंपनीने याप्रकारणी आपली भूमिका स्पष्ट करावी, वाशी येथील पोलीस निरीक्षक व पोलिसांचे सीडीआर काढून दोषींना सह आरोपी करावे.

या सर्व मागण्या मान्य करण्यापूर्वी मस्साजोग येथे एक दिवशीय लक्षणिक उपोषण करण्यात यावे व यावेळी प्रशासनाचे अधिकारी आल्यानंतर त्यांच्या समोर या सर्व मागण्या मांडण्याचा निर्णय झाला. तसेच, शेवटी गावाकऱ्यांनी सामूहिक अन्न त्याग आंदोलन करण्याच्या निर्णयाला सर्वांनी हात उंचावून सहमती दर्शविली.

खा. सुप्रिया सुळे मस्साजोगला येणार खासदार सुप्रिया सुळे मंगळवारी सकाळी 9 वाजता मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी येणार आहेत. आपल्याला फक्त न्याय पाहिजे. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत आपल्यात गैरसमज होऊ देऊ नका. अशी कळकळीची विनंती धनंजय देशमुख यांनी या बैठकीत बोलतांना केली.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा तपास राज्यात अनेक मोठ-मोठ्या घटना घडल्या परंतु सीआयडी, एसआयटी, न्यायालयीन चौकशी आणि सीबीआय चौकशी अशा प्रकारचा तपास कोणत्याही घटनेत करण्यात आलेला नाही. याची आठवण करुन देतानाच सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकारणाचा तपास योग्य दिशेने चालू असल्याचे सांगितले. तसेच, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल, एवढे सर्व पुरावे तपास यंत्रणेकडे उपलब्ध आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल, अशी भूमिका धनंजय देशमुख यांनी या बैठकीत मांडली.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धस