लोकमत न्यूज नेटवर्कबीड : खव्यापासून बनविलेले गुलाबजामून खाल्याने एकाच कुटूंबातील १० जणांना विषबाधा झाली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चौघांना घरी पाठविले असून सहा जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला.सर्फराज रियाज शेख (१०), महेक रियाज शेख (७), रेहान अमर शेख (१०), अहेमद अय्युब शेख (४), रूखैय्या अय्युब शेख (१) आणि हसिन खलिल शेख (५०) यांच्यावर सध्या उपचार सुरू असून इतर चौघांना घरी पाठविले आहे. हे सर्व बीड शहरातील बालेपीर भागातील रहिवाशी आहेत.उस्मानाबाद जिल्ह्यातील सरमकुंडी हे पेढा व खव्यासाठी प्रसिद्ध आहे. येथूनच शेख कुटूंबियांनी खवा आणला होता. यापासून नंतर गुलाबजामून तयार करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी खाल्ले. काही वेळानंतर त्यांना त्रास होऊ लागला. तात्काळ सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपचार करून चौघांना सुट्टी देण्यात आली तर सहा जणांवर अद्यापही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
बीडमध्ये खव्यातून १० जणांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:34 AM
खव्यापासून बनविलेले गुलाबजामून खाल्याने एकाच कुटूंबातील १० जणांना विषबाधा झाली. त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चौघांना घरी पाठविले असून सहा जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. हा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला.
ठळक मुद्देचौघांना सुटी तर सहा जणांवर उपचार सुरू