शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हुंड्यासाठी पत्नीचा खून करणाऱ्या पतीस १० वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2019 6:41 PM

बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथे एप्रिल २०१७ मध्ये ही घटना घडली होती.

बीड : हुंड्यासाठी पत्नीचा छळ करीत तिचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पतीस १० वर्षांचा सश्रम कारावास व सासू सासऱ्यास दोन वर्षांची शिक्षा सुनावली. हा निकाल बीडच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी दिला. बीड तालुक्यातील पिंपरगव्हाण येथे एप्रिल २०१७ मध्ये ही घटना घडली होती.

छाया गोरख आगम (रा. पिंपरगव्हाण) असे मयताचे नाव होते. ३ एप्रिल २०१७ रोजी छाया घरात एकटीच होती. रात्रीच्या सुमारास पतीने जमिनी व वडिलांच्या नावावरील प्लॉट माझ्या नावावर करुन दे असे म्हणत तिला मारहाण केली. त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. तसेच सासरा दादासाहेब व सासू रामकंवर यांनीही तिचा छळ केल्याची फिर्याद छायाचे वडील दिनकर मनोहर घोलप यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती.

ग्रामीण ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक जी. एन. पठाण यांनी तपास करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. सत्र न्या. क्रमांक ३ यु. टी. पौळ यांनी सदर प्रकरणात पुरावे व जबाब ग्राह्य धरुन आरोपी पती गोरख यास कलम ३०४ ब भादंवि मध्ये दोषी धरुन १० वर्षे सश्रम कारावास व हजार रुपये दंड तसेच सासू रामकंवर व सासरा दादासाहेब यांना छळ केल्याप्रकरणी कलम ४९८ अ अंतर्गत दोन वर्षे शिक्षा आणि प्रत्येकी हजार रुपये दंड ठोठावला. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून ठाकूर यांनी सहकार्य केले.

वडील व मित्राचा जबाब ठरला महत्त्वपूर्णया प्रकरणात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये छायाचे वडील दिनकर घोलप व लग्न जमवताना बैठकीत असणारा त्यांच्या मित्राचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला. बैठकीत तीन लोक होते. पैकी दोघांचा जबाब घेतला. यात एक फितूर झाला होता.

टॅग्स :MurderखूनjailतुरुंगCourtन्यायालयdowryहुंडाBeedबीड