अंबाजोगाई-: नदीत खेकडे धरूत अशी बतावणी करून ४ वर्षे वयाच्या बालिकेस निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश व्ही. के. मांडे यांनी गुरुवारी ठोठावली. अण्णा उर्फ भाऊराव प्रभाकर गदळे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या घटनेची माहिती अशी की, केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील फिर्यादी कुटुंब शेतात रहात होते. सदरील आरोपीने बालिकेच्या वडिलांकडे मदतनीस म्हणून काम करू लागला. तिथून बाहेर येऊन त्याने बलिकेस चल आपण नदीवर जाऊन खेकडे धरूत.असे म्हणत पीडित बलिकेस दूर अंतरावर घेऊन गेला.तिथे निर्जन स्थळी तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळ झाली तरी आपली मुलगी कुठे आहे. याचा शोध तिचे कुटुंबीय घेऊ लागले. तिथे खेळणाऱ्या मुलांकडे चौकशी केली असता. तुमची मुलगी तिकडे त्या व्यक्तीसोबत गेल्याचे सांगितले.शोध घेत कुटुंबीय तिकडे गेले असता पीडित बलिकेच्या रडण्याचा आवाज ऐकू येत होता. कुटुंबीयांनी मुलीला जवळ घेतले.व आरोपी तिथे पळसाच्या आळ्यात लपुन बसला होता.कुटुंबियांनी त्याला जागेवर पकडुन पोलीस ठाण्यात नेले.व त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादी वरून आरोपी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५४२ / २०१८, कलम ३७६ (२) (1), फौ. सु. का. - २०१८ व ३७६ ( 1 ) (2) भा. द. वी सहकलम ३, ४ बा. लैं. अ.प्र.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. हे प्रकरण अंबाजोगाई येथील अप्पर सत्र न्यायाधीश न्यायाधीश व्ही. के. मांडे यांच्या न्यायालयासमोर सुनावणीसाठी आले.सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने सदर साक्षीपुरावा व सरकारी वकीलाचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास ची शिक्षा व दहा हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड.लक्ष्मण फड यांनी काम पाहीले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस. कदम यांनी केला होता. तर पोलीस पैरवी म्हणून पो. कॉ. गोविंद कदम व पो.हे.कॉ. शिवाजी सोनटक्के यांनी काम पाहीले.