महाराष्ट्र राज्यातील शासनाची दिव्यांगसाठीची अंत्योदय योजना असून, दिव्यांगांना अंत्योदय योजनेत सामावून घेऊन स्वतंत्र शिधापत्रिका देण्यात येणार आहेत. धारूर तहसील कार्यालय अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेतून लाभ मिळावा यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडे प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावाला लागलीच जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे धारूर तहसील अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील १०० दिव्यांगांना याचा लाभ मिळणार आहे. यापैकी ५६ लाभार्थ्यांनी यासाठी अर्ज केले आहेत. उर्वरित आणखी ४४ लाभार्थी याचा लाभ घेऊ शकतात. यातून दिव्यांग व्यक्तींना प्रतिमहा २३ किलो गहू, १२ किलो तांदूळ, १ किलो साखर मिळणार आहे. जे व्यक्ती दिव्यांग आहेत त्यांनी धारूर तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका देताना प्राधान्य देण्यात येते. याच आधारावर धारूर तहसील दिव्यांग व्यक्तींना आधार देणार असल्यामुळे तालुक्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी जिल्हा पुरवठा अधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच धारूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांचे प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे यांचे आभार मानले आहेत.