बीड : मुलांमधील अंतर वाढविण्यासह खराब गर्भ असल्याचे कारण सांगत मागील २७ महिन्यांत तब्बल एक हजार दोन महिलांनी गर्भपात केल्याचे समोर आले आहे. हा आकडा केवळ जिल्हा रुग्णालयातील असून, अंबाजोगाई व इतर रुग्णालयांतील आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे सर्व गर्भपात १२ ते २० आठवड्यांच्या आतील असल्याचे सांगण्यात आले असून नियमातीलच आहेत.
नियमाप्रमाणे १२ आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येतो. त्यातही सात ते नऊ आठवड्यांपर्यंत गोळ्या दिल्या जातात; तर त्यापुढे शस्त्रक्रिया केली जाते. तसेच १२ आठवडे झाल्यानंतर गर्भपात करताना अटी घालण्यात आल्या आहेत. सोनोग्राफीमध्ये गर्भातील बाळाची प्रकृती खराब दिसली अथवा कुटुंब पूर्ण झालेले असतानाही अपत्य होत असल्याचे कारण असल्यास सर्वांची स्वाक्षरी घेऊन गर्भपात केला जातो. हे सर्व शस्त्रक्रिया करून केले जाते. कुटुंबाचे कारण देताना शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपातासह थेट कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाही केली जात असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा रुग्णालयात यासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केलेला आहे.
----
मुलांमधील अंतर कमी असल्यास अथवा गर्भातील बाळाची प्रकृती खराब असल्याचे अहवालातून समजताच गर्भपाताचा निर्णय घेतला जातो. ९ आठवड्यांपर्यंत गोळ्यांवरही गर्भ खाली करता येऊ शकतो; पण हे करताना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. रामेश्वर आवाड, स्त्रीरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, बीड
==
2019-20
510
2020-21
434
2021-22
58