बीड : जिल्ह्यात सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारी, नापिकी, बिकट आर्थिक परिस्थितीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक प्रश्न यामुळे नैराश्यातून शेतकºयांनी जीवनाला कंटाळले. जिल्ह्यात जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १०३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याची प्रशासनाकडे नोंद आहे.आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शासन पातळीवर विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्यात येते. मात्र तांत्रिक कारणांमुळे काही कुटुंबांना मदत मिळण्यात अडचणी आहेत.आतापर्यंत झालेल्या १०३ शेतकरी आत्महत्यांपैकी शासकीय मदतीसाठी ७४ प्रकरणे पात्र ठरली आहेत, तर ४ प्रकरणे अपात्र ठरली आहेत. सर्वात जास्त आत्महत्यांची नोंद मार्च आणि मे महिन्यामध्ये झाली आहे. दोन महिन्यात एकूण ३६ आत्महत्या झाल्या आहेत.प्रशासकीय पातळीवर वेळोवेळी आढावा घेतला जातो, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासकीय पातळीवर मदत मिळवून देण्याचे प्रयत्न होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बीड जिल्ह्यात सात महिन्यांत १०३ शेतकरी आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 11:45 PM