माजलगाव : परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने माजलगाव धरणात मोठ्या प्रमाणात आवक वाढली. यामुळे गुरुवारी पहाटे ११ गेट १ मिटरने उघडण्यात आले असुन याद्वारे ४३ हजार क्युसेसने पाणी सिंधफणा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासूनच धरणात पाण्याची आवक सुरू झाली होती. हे धरण १६ सप्टेंबरला पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणातून आजपर्यंत पाण्याचा विसर्ग सिंदफना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या धरणाचे सर्वात जास्त ११ गेट द्वारे ४३ हजार क्युसेस ऐवढे पाणी सोडण्यात आले होते. मागील आठवड्यापासुन शनिवारपर्यंत १ गेट द्वारे १ हजार २०० क्युसेनने पाणी सोडण्यात येत होते.
मागील ५-६ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असल्याने धरणातुन पाण्याचा मोठा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे. धरण क्षेत्रात बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे गुरूवारी मध्यरात्री अर्ध्या मिटने ९ गेट उघडण्यात आले होते. त्यानंतर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पाण्याची आवक वाढल्याने ११ गेट १ मिटरने उघडुन या द्वारे ४३ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सिंदफना नदीपात्रात सोडण्यात आला असल्याची माहिती धरणाचे उपविभागीय अधिकारी सी.एम.झेंड व कनिष्ठ अभियंता बी.आर.शेख यांनी दिली आहे.