जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ४ हजार ७२५ जणांची चाचणी करण्यात आली. यामध्ये ३ हजार ५८० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, तर १ हजार १४५ नवे रुग्ण आढळून आले. बीडमध्ये सर्वाधिक २७६ नवे रुग्ण आढळून आले, तर अंबेजोगाई २१९, आष्टीत १४९, धारुरमध्ये ३८, गेवराईत ८९, केजमध्ये १३१, माजलगाव ९१, परळीत ५९, पाटोदा ४७, शिरूरमध्ये ३१, वडवणी १५ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आता जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३९ हजार ३१३ इतकी झाली आहे. पैकी ३३ हजार ८४७ कोरोनामुक्त झाले असून, ७४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हचा टक्का ११.६५ टक्के इतका असल्याची माहिती जि.प.सीइओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार, साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.