जिल्ह्यात मंगळवारी ४२८८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल बुधवारी प्राप्त झाले. त्यात ३०१८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १२७० जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १७४, आष्टी १४६, बीड २१३, माजलगाव ७४,धारुर ६८, गेवराई १४२, केज १७३, परळी ५८, पाटोदा ४०, शिरूर १४१, वडवणी ४१ जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा ७० हजार २४८ इतका झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६२ हजार १८९ इतकी झाली आहे. जुन्या २० तर नवीन १७ जणांच्या मृत्यूची नोंद बुधवारी आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे बळींचा आकडा १२५३ इतका झाला आहे. सध्या ६ हजार ८०६ रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जि. प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
१२७० नवे रूग्ण, १३१४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:34 AM