जिल्ह्यात गुरुवारी ४,७८३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यात ३,६७१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर १,११२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले . बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ११९, आष्टी १२९, बीड २३८, धारुर ६८, गेवराई १११, केज १२१, माजलगाव ९१,परळी ५४, पाटोदा ९८, शिरुर ६६, वडवणी १७ जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा ७२ हजार ३७५ इतका झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६४ हजार २९० इतकी झाली आहे. जुन्या ११ तर २४ तासात मृत्युमुखी पडलेल्या ११ जणांची नोंद नोंद आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे बळींचा आकडा १,३४४ इतका झाला आहे. सध्या ६ हजार ७४१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जि.प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
१,२८८ कोरोनामुक्त तर १,११२ नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:32 AM