बीड : जिल्ह्यात सोमवारी १२९ नवे रुग्ण निष्पन्न झाले, तर १०९ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. गेल्या चोवीस तासात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली.
रविवारी ३ हजार ६२६ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल सोमवारी दुपारी प्राप्त झाले. यात १२९ पॉझिटिव्ह तर ३ हजार ४९७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ५, आष्टी ३०, बीड ८, धारूर १४, गेवराई १०, केज ४, माजलगाव ४, परळी ५, पाटोदा ३६ शिरुर ८ व वडवणी तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे.
मागील चोवीस तासात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात बीड शहरातील रामेश्वरनगरमधील ८० वर्षीय महिलेचा समावेश आहे.
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांचा आकडा ९१ हजार ६८३ इतका झाला असून, यापैकी ८७ हजार ९४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण बळींचा आकडा २ हजार ४९० इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.