बीड : जिल्ह्यात ५ मार्चपासून दुसऱ्या लाटेचा प्रभाव सुरु झाला. वेगाने वाढत गेलेली रुग्णसंख्या व मृत्यूसत्र यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, शनिवारी काहीसा दिलासा मिळाला. नव्या बाधितांपेक्षा कोरोनावर मात करुन सुटी मिळालेल्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली. १,३३९ नवे रुग्ण आढळले तर १,३५९ जण कोरोनामुक्त झाले. १८ जणांचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात शनिवारी ४ हजार २६ जणांच्या कोरोना चाचणीचे अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाले. यापैकी २ हजार ६८७ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर १,३३९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक ३२७ रुग्ण आढळले. अंबाजोगाई तालुक्यात २४२, आष्टी १९, धारुर ९६,गेवराई ५४, केज २१०, माजलगाव ६०, परळी १३६, पाटोदा ७४, शिरुर ६२ व वडवणी तालुक्यातील ५९ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी १,३५९ जण कोरोनामुक्त झाले. आता एकूण रुग्णसंख्या ६५ हजार १५२ इतकी झाली असून आतापर्यंत ५७ हजार ४३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ६ हजार ६३८ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जि.प.सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी.के.पिंगळे यांनी दिली.
बळींचा आकडा १,०८१
जिल्ह्यात शनिवारी १८ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील २५ वर्षीय पुरुष,सुगाव येथील ६८ वर्षीय महिला, ममदापूर येथील ६३ वर्षीय महिला,फ्लॉवर्स क्वॉर्टर जवळ ६१ वर्षीय पुरुष, बीडमधील सम्राट चौकाजवळील ४७ वर्षीय पुरुष, उक्कडपिंप्री येथील ६८ वर्षीय पुरुष,वडगाव येथील ६२ वर्षीय महिला,केकतपांगरी येथील ६५ वर्षीय पुरुष, अंबिलवडगाव येथील ५० वर्षीय महिला, भाळवणी येथील ४७ वर्षीय महिला, वासनवाडी येथील ६० वर्षीय महिला,शहाबाजपूर येथील ५० वर्षीय पुरुष, कोथिंबीरवाडी (ता. धारुर) येथील ५० वर्षीय पुरुष, वारंगळवाडी (ताग़ेवराई) येथील ६५ वर्षीय महिला,आवसगाव (ता. केज) येथील ५५ वर्षीय पुरुष, सावळेश्वर येथील ६० वर्षीय पुरुष,चकला उखंडा (ता. शिरुर) येथील ५५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. एकूण बळींचा आकडा १,०८१ इतका झाला आहे.