शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

उद्योगपतीला घरी बोलावून काढला अश्लील व्हिडिओ; ब्लॅकमेल करत मागितली १५ लाख खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 14:14 IST

व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, असा दम देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितली.

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात पोलिसासह ७ जणांवर गुन्हा

बीड : वीटभट्टीचालकाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १५ लाखांच्या खंडणीसाठी जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री एक पोलीस, दोन महिलांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यातील तिघांना अटक करण्यात आली असून, इतर फरार आहेत.

आष्टी येथील एका महिलेने भ्रमणध्वनीवरून नितीन रघुनाथ बारगजे (रा. टाकळी, ता. केज) या तरुणास फोन करून मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. माझ्यासोबत कोणी नाही, मला पाटोद्यापर्यंत सोडा, असे म्हणत पुढे आष्टीपर्यंत नेले. घरी गेल्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बारगजे यांना रूममध्ये कोंडून जबरदस्तीने लगट करतानाचा व्हिडिओ महिलेच्या साथीदारांनी काढला. हा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू, असा दम देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितली. महिलेचा साथीदार पैसे घेण्यासाठी त्या वीटभट्टीचालकासोबत थेट केज तालुक्यातील टाकळी गावात पोहोचले. केज येथे आल्यानंतर बारगजे यांनी आपल्या मित्र व नातेवाईकांकडे दहा लाख रुपये हातउसने मागितले.

यात काही तरी वेगळा प्रकार असल्याचा संशय त्यांना आला. ‘तुमचे अन्य लोक पैशासाठी बोलवा, व्हिडीओ क्लिप डिलिट करून प्रश्न कायमचा मिटवा, तुमचे पैसे देऊन टाकू’, असे बारगजे आणि मित्रांनी म्हटल्यानंतर संबंधिताने आपले साथीदार केजमध्ये बोलवून घेतले. त्यावेळी चारचाकीमधून तिघेजण त्याठिकाणी आले. नितीन बारगजे याच्याकडून खंडणी वसूल करणाऱ्या शेखर वेदपाठक यास पोलिसांनी अटक केली, अन्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. 

नेकनूर पोलीस ठाण्यात आरोपी प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा कदम, सविता वैद्य व कटात सामील असणारा पोलीस कर्मचारी कैलास गुजर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस,कर्मचारी एल.व्ही. केंद्रे यांनी भेट दिली. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस भारत राऊत हे करत आहेत. 

यापूर्वी प्राध्यापकाला मागितली होती खंडणीयाच प्रकरणातील सविता वैद्य या महिलेने बीड येथील एका गुंडाच्या माध्यमातून व्हिडीओ व्हायरल करण्याची भिती दाखवत एका गुंडाच्या माध्यमातून गेवराई येथील एका प्राध्यापकास असेच अडकवून २० लाखांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी देखील सविताच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

दोन महिलांसह तिघे अटकेतया प्रकरणातील आरोपी शेखर वेदपाठक, सविता वैद्य व सुरेखा शिंदे या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेचे विजय गोसावी आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यापैकी शेखर वेदपाठक याला न्यायालयात हजर केले असता त्याला ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  सुरेखा कदम हिने सुरेखा शिंदे असे खोटे नाव सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAurangabadऔरंगाबाद