शिरुर कासार (बीड ) : शहराच्या पश्चिमेला असलेल्या दक्षिण उत्तर डोंगराला गुरूवारी दुपारनंतर लागलेल्या आगीने जवळपास दीडशे एकराचा कोळसा झाला. यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पशूपक्षांचे अन्न भक्ष्यस्थानी पडल्याने समस्या निर्माण झाली आहे. आग लागलेले हे डोंगर क्षेत्र खाजगी मालकीचे असल्याचे सांगितले जाते.
शिरूर शहराच्या पश्चिम दिशेला दक्षिण उत्तर असा डोंगर असून त्यात काही क्षेत्र खाजगी मालकीचे तर उर्वरीत भाग वन विभागाच्या ताब्यात आहे. गुरूवारी दुपारनंतर कासळवाडी बाजूने आग लागली. ती हवेच्या दिसेने व्यापली. त्यात वार्णी, शिरूर, दहीवंडीकरांच्या मालकी हक्काचे क्षेत्र येते. या आगीत आमच्या मालकी हक्काचे जवळपास चाळीस एकर क्षेत्र आगीत जळाले असल्याचे दहीवंडीच्या सरपंच शीला आघाव यांनी सांगितले. डोंगरावर रात्रभर धुराचे लोट दिसत होते. आगीत वाळलेले गवत म्हणजेच जनावराचा चारा तर जळून गेलाच; परंतु लहान लहान जीवजंतू जे की मोराबरोबर अन्य प्राण्याचे खाद्य असते ते होरपळले. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खाजगी डोंगराला लागलेली आग वन क्षेत्राकडे सुदैवाने न गेल्याने वन क्षेत्रातील झाडे झुडपे सुरक्षित राहिल्याचे वन विभागाचे विजय केदार यांनी सांगितले. आगीचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
चाळीस एकरांत पसरली होती आगतालुक्यातील कासळवाडी बाजूने आग लागत हव्याच्या दिशेने व्यापली. यात वार्णी, शिरुर, दहिवंडीकरांच्या मालकी हक्काचे क्षेत्र येते.आगीत वाळलेले गवत म्हणजे जनावरांचा चारा तर जळूनच गेला, पशुपक्षी होरपळल्याचा अंदाज आहे