जिल्ह्यातील २ हजार २१७ संशयितांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यात १५४ पॉझिटिव्ह आले तर २ हजार ६३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेे. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ९, आष्टी ५९, बीड १४, धारुर ५, गेवराई ११, केज २२, माजलगाव ४, परळी १, पाटोदा २, शिरुर २० व वडवणी तालुक्यातील ७ रुग्णांचा समावेश आहे.
आता एकूण बाधितांचा आकडा ८९ हजार ४९१ इतका झाला असून यापैकी ८५ हजार ५८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात १ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर.बी. पवार यांनी दिली.
बळींची संख्या २,३४६
जिल्ह्यात सोमवारी ३९ जणांच्या मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात २४ तासांतील दहा तर जुन्या २९ मृत्यूंचा समावेश आहे. एकूण मृत्यूसंख्या २,३४६ इतकी झाली आहे. २४ तासांतील दहा बळींमध्ये ७० वर्षीय पुरुष वानगाव (ता. बीड), ५५ वर्षीय पुरुष कसबा विभाग, धारुर, ६० वर्षीय महिला उपळी (ता. वडवणी), ७६ वर्षीय पुरुष पायतळवाडी (ता. माजलगाव), ७४ वर्षीय महिला अंबलटेक (ता. परळी), ५२ वर्षीय पुरुष पूरग्रस्त कॉलनी, बीड, आष्टी तालुक्यातील कासेवाडी येथील ६९ वर्षीय पुरुष, आष्टीतील ९० वर्षीय महिला, धामणगाव येथील ८० वर्षीय पुरुष व कारखेलच्या ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.