लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत बीड जिल्ह्यातील १५९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.
बीड जिल्हा परिषदेतील मराठी माध्यमाचे १५६ तर उर्दू माध्यमाचे ३ अशा १५९ शिक्षकांचा आंतरजिल्हा बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे. त्यानुसार जिल्ह्यात १५९ शिक्षक बाहेरील जिल्ह्यातून येणार आहेत.राज्याच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
२०१८ मधील टप्पा क्र. २ नुसार या बदल्या करण्यात आल्या. या शिक्षकांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले. निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या जिल्ह्यांमध्ये जे शिक्षक प्रत्यक्ष निवडणूक कामावर आहेत. त्यांना आचारसंहिता कालावधी संपल्यानंतर कार्यमुक्त करावे अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत.
सर्वाधिक गेवराई, पाठोपाठ धारुरआंतरजिल्हा बदली झालेल्यांमध्ये गेवराई तालुक्यातून ५० पेक्षा जास्त शिक्षकांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ धारुर तालुक्यातील शिक्षकांचा समावेश आहे.