जिल्ह्यातील ३ हजार ४४५ संशयितांची कोरोना चाचणी बुधवारी करण्यात आली. त्याचे अहवाल गुरुवारी दुपारी प्राप्त झाले. यात १६८ पॉझिटिव्ह तर ३ हजार २७७ निगेटिव्ह अहवाल आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात १९, आष्टी २५, बी. ३३, धारुर ६, गेवराई १५, के. २५, माजलगाव १२, परळी ९, पाटोदा ५, शिरुर १४ आणि वडवणी तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे. आता एकूण कोरोना बाधितांची संख्या ८८ हजार ९१९ इतकी झाली असून, यापैकी ८४ हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत २,१६२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार ९६२ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जि.प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
नवे १६८ रुग्ण, ३१७ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:23 AM