शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी १७ जणांवर गुन्हा; आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 7:03 PM

सहा जणांना १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

अंबाजोगाई (बीड) : शहरालगत असलेल्या चनई येथे बुधवारी (दि.०५) सकाळी ग्रामपंचायत सदस्याचा रेशन दुकानदारासोबत वाद झाला. या वादाची कुरापत काढून सायंकाळी त्या ग्रामपंचायत सदस्याची तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात १७ जणांवर ॲट्राॅसिटीसह खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

गोरखनाथ सीताराम घनघाव (वय ४९, रा. चनई) असे त्या मयत ग्राम पंचायत सदस्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा रामधन यांच्या फिर्यादीनुसार, १७ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला  आहे. यात मनोज नवनाथ ईटकर, नवनाथ मरगु ईटकर, धीरज रमेश कदम, सुरज रमेश कदम, रमेश प्रल्हाद कदम, प्रवीण उत्तम मिसाळ, आकाश नवनाथ ईटकर, रोहित अविनाश शिनगारे, शैलेश लहू मोरे, राहुल अंकुश क्षीरसागर, सिद्धेश्वर प्रकाश पांचाळ, शरद वैजनाथ ढगे, शुभम बंडू उमाप, धर्मराज ज्ञानोबा चौरे, सुरज नारायण उमाप, गोविंद नारायण उमाप आणि दगडू आत्माराम मोरे या १७ जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम ३०२, ३२६, ३२४, १२०-ब, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ आणि अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, शहर  पोलिसांनी आतापर्यंत पाच  आरोपींना ताब्यात घेतले आहे.

आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्यागोरखनाथ  घनघाव यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा.या मागणीसाठी गुरुवारी दुपारी मयताच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.जो पर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत प्रेत ताब्यात घेतले जाणार नाही. अशी भूमिका मांडली.मात्र अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सर्व नातेवाईकांची समजूत काढली. आरोपींच्या अटकेसाठी दोन स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहेत. ते आरोपींचा शोध घेत आहेत. तर ६ जणांना अटक करण्यात आली असल्याचे सांगून निर्माण झालेला तिढा दूर केला.या प्रकरणाचा पोलीस तपास पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड करीत आहेत.

६ जणांना १० ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीचनई खुन प्रकरणातील नवनाथ मरगु ईटकर,रमेश कदम, धीरज कदम,शिवराज कदम,रोहित शिनगारे,सिद्धेश्वर पांचाळ या सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना  जिल्हा  सत्र न्यायाधीश व्ही.के.मांडे यांच्या न्यायालयासमोर हजर  केले असता सहा   आरोपींना दहा ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले.

टॅग्स :BeedबीडagitationआंदोलनCrime Newsगुन्हेगारी