सोमवारी ३ हजार ५६१ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यात १७० रूग्ण पॉझिटिव्ह तर ३ हजार ३९१ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक ६४, अंबाजोगाई ८, बीड १९, धारुर ३, गेवराई १८, केज ११, माजलगाव ७, परळी २, पाटोदा १४, शिरुर १२ व वडवणी तालुक्यातील १२ जणांचा समावेश आहे.
मागील चोवीस तासात ६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. यात माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील ३३ वर्षीय महिला, माजलगाव शहरातील ७२ वर्षीय महिला, अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथील ७१ वर्षीय पुरूष, अंबाजोगाई येथील ७५ वर्षीय पुरुष, गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथील ५० वर्षीय महिला, मालेगाव येथील ५८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या ९१ हजार ८५३ इतकी झाली असून, यापैकी ८८ हजार १२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण बळींचा आकडा २ हजार ४९६ इतका झाला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार २३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
------